• Thu. Apr 24th, 2025 9:50:01 AM
    ‘ते फक्त कोकणात मासे-मटण खाण्यासाठीच…’ नारायण राणेंचा ठाकरेंना उपरोधिक टोला; विकासनिधीवरुनही घेरले

    Narayan Rane Criticizes Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हा संघर्ष जुना आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळातील कोकण दौऱ्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे.

    Lipi

    प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हा संघर्ष जुना आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळातील कोकण दौऱ्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. ‘कोकणात उद्धव ठाकरे येतो, ते फक्त मासे मटण वडे खाण्याकरताच येतो, म्हणून मी येथील व्यवसायिकांना सांगितलं आहे. त्या दिवशी मटण वडे, मासे बंद ठेवा’ अशी उपरोधिक टीका नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या बैठकीला आज खासदार नारायण राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    नारायण राणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशांची आकडेवारी जरा मागवा. तो कोकणात येणारही नाही, नाहीतर मी तुम्हाला आकडेवारी देईन. त्याने किती पैसे सिंधुदुर्गला दिले? असाही खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. मग कळेल काय अधिकार आहे त्यांना कोकणावर बोलायचा. म्हणून मी हॉटेलवाल्यांना सांगितलं की, कोंबडी वडे आणि मासे बंद करा. ज्या दिवशी तो येईल त्या दिवशी दुसरं काही करत नाही तेवढेच खायला तो येतो.
    CM Fadnavis on Tahawwur Rana : तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मला खूप आनंद…’

    ‘चिपी विमानतळ बंद होणार नाही’

    चिपी विमानतळावरून आता सेवा पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाली आहे, यावर राणे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, आता इंडिगो पण येणार सगळे येणार आता ते कधी बंद होणार नाही. देशात सगळीकडे विमान जातील येतील, यासाठी माझे प्रयत्न आहेत. पण लोकांनी प्रवास करावा आणि त्यासाठी उत्पन्न वाढावं, यासाठी माझे प्रयत्न आहेत. कोकणातील माणसांनी उद्योगधंदे करावेत हा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

    नारायण राणे यांच्या या विधानानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलं आहे. राणे यांनी केलेल्या टीकेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed