रानात काजू बिया जमवायला जाणे जीवावर बेतले, माशांच्या हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवीरीत्या मृत्यू
रानातील गांधील माशांच्या हल्ल्यात यापूर्वीही काही जणांचे जीव गेले आहेत. रानात असलेल्या तुमसड माशांचा हल्ला जीवावरही बेतू शकतो. अशाच माशांच्या हल्ल्यात तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एका 43 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रामदास गोविंद गवस (वय 43, रा. मांगेली, तळेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रामदास हे रानात काजू बिया जमवण्यासाठी गेले होते. याचवेळी माकडाने फांदी हलवल्याने त्या ठिकाणी असलेल्या माशांच्या घराला काहीसा धक्का लागला आणि माशांनी जवळ असलेल्या रामदास यांच्यावर चवताळून हल्ला केला ज्यात त्यांचा मृत्यू झाला.