उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले शहर पदाधिकारी ओंकार चव्हाण यांनी उद्धव ठाकरें यांचा विरोध केला.उद्धव ठाकरेंनी वक्फ बिलचा कडाडून विरोध केला म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली असं ते म्हणाले.आम्ही हिंदुत्ववादी आहोत, वक्फ बिलचा समर्थन करणार अशी ठाम भूमिका ओंकार चव्हाण यांनी मांडली.उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आता मुघल सेना झाली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शहर पदाधिकारी ओंकार चव्हाण यांनी दिली आहे.वक्फ बिलच्या समर्थनार्थ आम्ही जाहीरपणे रस्त्यावर उतरणार असेही ओंकार चव्हाण यांनी सांगितले आहे.