Suresh Dhas Allegations on Walmik Karad : बीडमध्ये अजूनही आकाची टोळी कार्यरत आहे. खंडणीतून नाही मिळालं तर चोरी करुन मिळवायचं असा सगळा प्रकार आकाच्या टोळीकडून सुरु असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
“दोन-चार दिवसांत आरोपी सापडतील. त्यात शंभर टक्के हेच लोकं राहतील. आकाची टोळी अजूनही कार्यरत आहे. आकांनी जे पोलीस काही ठिकाणी, अजून पोलिसांच्या बदल्या झालेल्या नाहीत ना, आणि एसपी नवीन आहेत. त्यांना एवढी माहिती नाही. पण आकाने जे जागोजागी नेमलेले लोकं आहेत ते अजून जिल्ह्यामध्ये आहेत. ते अजून त्रासदायक आहेत”, असा धक्कादायक दावा सुरेश धस यांनी केला आहे.
‘इकडून नाही मिळालं तर आकाच्याच लोकांनी…’
“कोणीतरी भुरटे चोर असतील, आकाच्या सहकाऱ्यांना यापूर्वी सवयी लावलेल्या आहेत. इकडून नाही मिळालं तर आकाच्याच लोकांनी जावून चोऱ्या करायच्या. आता सुरक्षा रक्षकाचे पाय बांधल्यानंतर तो काय करणार? अजूनही या लोकांची डोकी जागावर नाहीत. असंच खंडणी प्रकरणात एका दलित समाजाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्याच्या नादातच एवढी मोठी घटना घडलेली आहे. तरीसुद्धा यांचं डोकं जागेवर नाही. आता बघा दोन-चार दिवसांत आरोपी सापडतील. त्यात हेच लोकं असतील”, असा दावा सुरेश धस यांनी केला.
“वाल्मिक कराडच्या बाबतीत आणखी बरंच काही सापडणार आहे. फक्त सीआयडीलाच नाही तर ईडीची सुद्धा त्यांना पूर्वीची नोटीस आहे. ईडीसुद्धा तपास करणार आहे. त्यामुळे सर्व काही सापडेल”, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला.