Pune Weather Update : वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहर आणि उपनगरांमध्ये तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे नोंदवला गेला आहे. तर पुढील दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
शहरात सोमवारी हंगामातील उच्चांकी ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. रात्रीचा उकाडाही वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत, मंगळवारीदेखील सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली, दुपारी बारानंतर उन्हामुळे काहिली होत होती. घरात उकाडा आणि उन्हात गरम वातावरणात फिरताना नागरिक बेचैन झाले. संध्याकाळी ऊन उतरले तरी वातारणात गरम हवा जाणवत होती, जमीनही तापली होती. एरवी रात्री जाणवणारे सुखद वातावरण बुधवारी अनुभवायला मिळाले नाही. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन २४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली.
Versova Dahisar Coastal Road : वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्ग, भाईंदर उन्नत ते गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचीही जोड; कुठून कसा असेल रुट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. विदर्भात देखील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले. जळगावातील भुसावळमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशावर जाऊन पोहोचला आहे. तर शहरात ४३.७ अंश होते. नीचांकी १९ अंश सेल्सिअस तापमान महाबळेश्वरमध्ये नोंदवण्यात आले. उष्णतेच्या लाटेसदृश ही परिस्थिती अजून दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

