• Sun. Mar 8th, 2026
    Akola News: आधी जोरदार धडक अन् मग रस्त्यावर फरफटत नेलं; अकोल्यात हिट अँड रनचा थरार

    Akola Hit And Run Case: अकोल्यात हिट अँड रनची भयंकर घटना घडली आहे. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    Lipi

    प्रियंका जाधव, अकोला : अकोल्यातील मोठी उमरी भागात हिट अँड रनची घटना घडली आहे. अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या उमरीमधील ग्रामपंचायत समोर एका चार चाकी कारने दुचाकीस्वारास मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी स्वाराला काही अंतरावर फरफटत नेऊन पुढे दुचाकी लहान उमरी येथील नाक्यापर्यंत घासत आणली. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून अपघाताचा थरार बघायला मिळाला आहे. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विजय बाळूसिंग सोळंके असं कार चालकाचे नाव आहे.

    सविस्तर घटना अशी की, दुचाकीस्वार गोपाल नागे एसटी महामंडळामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. मोठी उमरी येथील ग्रामपंचायत जवळील दुध डेअरीमधून साहित्य घेऊन ते दुचाकीने जात असताना, अचानक मागून चार चाकी कार क्रमांक एम एच 28 DK 2735 ने दुचाकीला मागुन जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकी क्रमांक एम एच 30 w 5850 ला चालकासह काही अंतरावर कार चालकाने फरफटत नेले, दुचाकीस्वार गोपाल नागे रस्त्याच्या कडेला खाली पडले. परंतु, कार चालक इथेच थांबला नाही. पुढे लहान उमरी येथील नाक्यापर्यंत ही दुचाकी चक्क घासत नेली.

    उमरी परिसरामध्ये रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांनी ही दुचाकी फरफटत नेताना प्रत्यक्ष बघितल्यामुळे नागरिकांनी कार चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु कार चालका तेथून पळ काढण्यात यशस्वी झाला. संतप्त नागरिकांनी यावेळी कारची तोडफोड केली. दरम्यान, सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणून कार व दुचाकी ताब्यात घेतली आहे. कार चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत.

    चारचाकी गाडीवर पोलिसाचे चिन्ह असलेले स्टिकर

    ज्या चारचाकी गाडीने दुचाकीला उडवले त्या चारचाकी कारवर पोलीस विभागाचे चिन्ह लावलेले आहे. कार चालक हा सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा आहे. वडील सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्याच्या कारवर पोलिसाचे चिन्ह लागले आहे. नियमाने बघितले तर अश्याप्रकारे पोलिसाचे चिन्ह लावणे गुन्हा आहे. यावर कारवाई करेल कोण? हाच मोठा प्रश्न आहे. पण सध्या विजय बाळूसिंग सोळंकेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल पण होणार आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed