• Tue. Apr 22nd, 2025 7:36:12 AM

    चला येतो लवकरच; निरोप घेऊन वैद्य कुटुंब निघालं ते कायमचंच, अपघातात चौघांचाही मृत्यू

    चला येतो लवकरच; निरोप घेऊन वैद्य कुटुंब निघालं ते कायमचंच, अपघातात चौघांचाही मृत्यू

    Wardha Police Family Accident Death : रामनवमीच्या उत्सवात सहभागी झालेले वैद्य कुटुंब आनंदात घराकडे परत निघाले होते. परत निघताना संपूर्ण कुटुंबाला काहीच दिवसांत परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते

    महाराष्ट्र टाइम्स
    वैद्य कुटुंबाचा मृत्यू

    वर्धा : वर्धा-समुद्रपूर मार्गावरून जात असताना अचानक रानडुक्कर आडवे आल्याने कार टँकरवर धडकली. या भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी अशा चौघांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास तरोडा शिवारात ही घटना घडली.

    समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील प्रशांत वैद्य हे पोलिस कर्मचारी म्हणून वडनेरच्या ठाण्यात कार्यरत होते. रामनवमी असल्याने कुटुंबासह मांडगावला आले होते. सोमवारी रात्री गावावरून कारने परत वर्ध्याला निघाले. तरोडा गावाजवळील साखरा फाट्यावर अचानक कारसमोर रानडुक्कर आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

    कार समोरून येणाऱ्या डिझेलच्या टँकरवर धडकली. या अपघातात प्रशांत यांच्यासह पत्नी प्रियंका, मुलगा प्रियांश, मुलगी मनस्वी असे चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    काही वेळातच प्रियंका आणि प्रियांश यांचा मृत्यू झाला. प्रशांत यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरच्या एम्स रुग्णालयात हलविण्यात आले. मनस्वीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले गेले गेले. पण, उपचारादरम्यान बापलेकीचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार ठाकूर करीत आहेत.

    क्षणात संपले कुटुंब

    रामनवमीच्या उत्सवात सहभागी झालेले वैद्य कुटुंब आनंदात घराकडे परत निघाले होते. परत निघताना संपूर्ण कुटुंबाला काहीच दिवसांत परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण, रानडुक्कर आडवा आला आणि क्षणात अवघे कुटुंबच संपले. काही वेळापूर्वी आनंद ओसंडून वाहणाऱ्या घरात दुःख पसरले. कुटुंबीयांनी आक्रोश केला. त्यांच्या आक्रोशाने अवघा गाव हळहळला.
    Satara Crime : पुण्याचं कुटुंब महाबळेश्वरला फिरायला, अज्ञाताने युवतीला कॅमेरात टिपलं, पोलिसांना मोबाईलमध्ये सापडले २५०० फोटो

    ‘हिट अँड रन’मध्ये वडिलांचा मृत्यू, मुलगी आणि भाची गंभीर

    दुसरीकडे, भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने वडिलांचा जागीच मृत्यू तर मुलगी व भाची गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघींवर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी मोरगाव वन ते पांढरकवडा मार्गावर घडली.
    Baba Siddique यांचा जीव घेणारा सूत्रधार सापडला? भाजप नेत्याच्या घरावर हल्ला; कारवाईत झिशान सापडला

    रामदास जलपत धुर्वे (५०) रा. सायखेडा असे मृताचे नाव आहे. तर तृप्ती रामदास धुर्वे (२४) व वैष्णवी विलास पेंदोर (२३) रा. कारेगाव (झरी) असे भाचीचे नाव आहे. रामदास हे सायखेडा येथे राहत होते. घरी काही कार्यक्रम असल्याने त्यांच्या बहिणीची मुलगी वैष्णवी पाहुणी म्हणून आली होती.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed