Nandurbar Water Shortage : पाणी हेच जीवन आहे, पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही, याची खरी प्रचिती धडगाव तालुक्यातील बिलगांव-हेंद्र्यापाडा येथील आदिवासी लोकांची पाण्यासाठी होणारी वणवण पाहून होते.
धडगांव तालुक्यातील बिलगांव-हेंद्र्यापाडा गावांतील लोकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगरदऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे. डोंगरदऱ्याची एवढी बिकट वाट आहे की, हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो. घरात अर्धा हंडाच पाणी पोहचते. हर घर नलचा प्रचार करणाऱ्या सरकारने देशभर जनजीवन मिशन योजना राबविली आहे. या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे, प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणे हा मुख्य उद्देश असला तरी हेंद्र्यापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहचली आहे,पाणी मात्र पोहचलेच नाही.
Nashik News : कंडोम, फायटर, पत्त्यांची कॅट…., आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात धक्कादायक वस्तू
हेंद्र्यापाडा एकूण १३० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. हेंद्र्यापाडा हा बिलगाव ग्रामपंचायतीतील आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत हेंद्र्यापाडा येथे ही योजना पोहचलीच नाही. पाण्याची सोय झाली तर माणसांसाठी व गुरांसाठी प्यायला पाणी मिळेल, अशा अनेक समस्या सुटतील.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत धडगांव तालुक्यातील बिलगांव-हेंद्र्यापाडा येथे पाण्याची सुविधा करून द्यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. हर घर नलचा प्रचार करणााऱ्या सरकारने देशभर जनजीवन मिशन योजना राबविली. या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे, प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहचवणे हा मुख्य उद्देश असला तरी बिलगांव हेंद्र्यापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहोचली आहे.

