२०१९ मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवलेल्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे. ठाकरेंच्या साथीला येत असल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. सहदेव बेटकर यांचा आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रवेश पार पडला.शिवसेना सोडून ते काही काळापूर्वी काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा ठाकरेंचा झेंडा हाती धरला आहे.