Girish Mahajan on Eknath Khadse : पत्रकार अनिल थत्ते यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ या व्हायरल क्लिपचा हवाला देत आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन हे एका महिला आयएस अधिकाऱ्याशी रात्री उशीरा वारंवार बोलत असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला होता.
अनिल थत्तेंची व्हायरल क्लीप
पत्रकार अनिल थत्ते यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ या व्हायरल क्लिपचा हवाला देत आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन हे एका महिला आयएस अधिकाऱ्याशी रात्री उशीरा वारंवार बोलत असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला होता. तसेच यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी भेटून विचारणा केली असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.Maharashtra Government : ना अर्थ मंत्रालयाची मंजुरी, ना मंत्रिमंडळ-राज्यपालांची; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परस्पर नियमबदल?
शाहांनी खडसावल्याचा दावा
एकनाथ खडसे म्हणाले, की “अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपमध्ये म्हटले आहे की, गिरीश महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बैठक झाली, त्यावेळी शहांनी महाजनांना याबाबत विचारणा केल्याचे थत्तेंनी नमूद केले आहे. रात्री महिलांशी कॉलवर बोलण्याची गरज काय असते? अशी विचारणा शाहांनी केल्याचे थत्ते यांनी म्हटले आहे. याबाबत मीदेखील अमित शहांना भेटणार असून, या प्रकरणाबाबत त्यांना विचारणा करणार आहे” असेही एकनाथ खडसे म्हणाले.Sahyadri Election : भाजप आमदाराला सवतासुभा भोवला, ‘सह्याद्री’वर शरद पवारांच्या शिलेदाराची सत्ता, बाळासाहेब पाटलांचा विजयाचा गुलाल
‘मला बोलायला लावू नका’
यावर पोहरादेवी येथे पत्रकारांशी बोलतांना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की एकनाथ खडसे एक नंबरचे महाचोर आहेत, कमरेखाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरे जमत नाही. माझा अंत पाहू नका, मी जर एका गोष्टीचा खुलासा केला, तर खडसे तोंड काळं करतील. घरातलीच गोष्ट आहे. पण, मी बोलणार नाही. बोलायला लावू नका, असा इशाराही मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना दिला आहे.