शिवसेना नेते पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात नेत्यांना मतदारसंघात अधिक काळ राहण्याची सूचना दिली आहे. त्यांनी सांगितले की नवीन आणि जुन्या पदाधिकाऱ्यांचे संयोजन करून कामगारांची जवाबदारी निश्र्चित केली जाणार आहे. विकासाच्या कामांसाठी दीपक केसरकर, निलेश राणे आणि रवींद्र फाटक यांच्या एकत्रित निर्णयाचे महत्त्व सांगितले आहे.
“सोमवार पासून रविवार पर्यंत आपण जर का मुंबईत ठाण मांडत बसत असू तर आपण सिंधुदुर्ग मधील संघटना कधी बांधणार आहोत याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे अशा शब्दात सामंत यांनी सुनावले आहे. मंगळवार बुधवार मुंबई जायला कोणाचा आक्षेप नाही कारण मंत्रिमंडळाच्या मिटिंगच्या दिवशी मंत्री भेटू शकतात”, असेही सामंत यांनी म्हटलं आहे.
माझ आताच शिंदे साहेबांशी बोलणं झाल आहे असं सांगत नवे आणि जुने यांचा कॉम्बिनेशन नक्की करू पण काही अधिकारी 15-15-20 वर्ष एकाच पदावर बसून राहतात आणि तिथे वहिवाट लावतात अशी वहिवाट कोणी जर का लावली असेल आणि तो जर का काम करत नसेल तर त्याने स्वतःहून माझ्याकडे पत्र आणून द्यावीत मला आणि आमच्या नेते मंडळींना निर्णय घ्यायला भाग पाडू ये असा सज्जड दम शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात बोलताना काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. काही लोकांची मक्तेदारी अशी पडलेली असते की मी हलवणारच नाही माझंच ते पद आहे. या पदावर दुसरा कोणी बसू शकत नाही, असं सामंत म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित संवाद बैठकीत सामंत बोलत होते. या बैठकीस माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, दत्ता सामंत, संजय आग्रे, राजा गावडे, रुपेश पावसकर, आनंद शिरवलकर, संजय पडते, अशोक दळवी, वर्षा कुडाळकर, सचिन वालावलकर, वैशाली पावसकर, गणेश गवस आदी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.