पीक विमा,कर्जमाफीतून शेतकरी लग्न,साखरपुडे करता असं विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं.माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानाचा राज्यस्तरावर विरोध सुरू झाला आहे. शेतकरी बांधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.आमच्या शेतीमालाला योग्य हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.तूर,सोयाबीन,उडीद या पिकांना योग्य हमीभाव नसल्याने आम्हाला पीककर्ज काढावे लागतं असं शेतकरी म्हणाले.शेतकऱ्यांच्या पोरांना लग्नासाठी मुली देखील द्यायला तयार नाहीत अशी प्रतिक्रिया शेतकऱ्याने दिली आहे.