Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम5 Apr 2025, 9:02 am
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील आणखी एक प्रकरण समोर आणलं आहे.बीडमध्ये सावकरांकडून होत असलेल्या शोषणाचं प्रकरण अंजली दमानियांनी समोर आणलं आहे.सावकारांच्या त्रासामुळं एका व्यक्तीनं स्वतःला संपवल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या.मंगेश बोबडे आणि बजरंग बोबडे या भावांनी दिलीप धूत नावाच्या सावकाराकडून पैसे घेतले होते.परंतु पूर्ण पैसे अन् व्याज देऊनही सावकारानं त्रास दिल्यानं मंगेश बोबडेनं स्वतःला संपवलं, तर बजरंग बोबडे गायब असल्याचं दमानिया म्हणाल्या.