तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अडचणीत आले आहे. या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या आंदोलनामुळं रुग्णालयाबाहेर तणाव निर्माण झाला आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.