Ajit Pawar News : बीडच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून बीडमधील विविध गँगना सुतासारखे सरळ करण्याचा इशारा दिला. त्यांनी मराठा आणि वंजारी वादावर भाष्य केले. अजित पवार हे आज बीड दाैऱ्यावर असून अनेक बैठका ते यावेळी घेणार आहेत.
अजित पवारांनी युवा संवाद मेळाव्यातून अनेकांवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले की, माझ्या कामाच्या पद्धतीत आणि इथल्या कामामध्ये खूप फरक आहे. बीडमध्ये वाळूची गँग, राखेची गँग अशा अनेक गँग आहेत. आता इथल्या या सगळ्या गँगला सुतासारखे सरळ करणार आहे, असे अजित पवारांनी म्हटले. एकप्रकारे त्यांनी बीडमधील सर्वच गँगला मोठा इशारा दिल्याचे बघायला मिळाले. यासोबतच बीडमधील मराठा आणि वंजारी वादावरही त्यांनी भाष्य केले.Beed : बीडमध्ये येताच अजित पवारांचा चढला पारा, थेट म्हणाले, इथल्या लोकांना शिस्तच नाही, एसपींनाही धरले धारेवरअजित पवार म्हणाले की, बीडकरांची बदनामी होणाऱ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. बीडमध्ये मराठा आणि वंजारी यांच्यात अनेकदा वाद दिसून आले आहेत. जाती जातीतील दुरावा संपवायचा आहे. आपल्यालाच हा दुरावा संपवायचा असल्याचे दादांनी म्हटले. यासोबत कार्यकर्त्यांना आपले चरित्र स्वच्छ ठेवण्याचा सल्लाही अजित पवारांनी दिला. कार्यकर्ता घेत असताना त्याचे रेकॉर्ड बघा. सोशल मीडियावर तेढ निर्माण होईल, असा पोस्ट शेअर करू नका.
अजित पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये दादागिरी खपवून घेतली जाणार नाहीये. समाजात एकोपा राहील असे काम झाले पाहिजे. अजित पवार हे बीडमध्ये दाखल होताच त्यांनी एसपींना धारेवर धरले. कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने हेलिपॅडवर आल्याने अजित पवार संतापल्याचे बघायला मिळाले. तुम्ही यांना काहीच बोलत नसल्याचे म्हणत नाराज होऊन अजित पवार आपल्या गाडीमध्ये बसताना दिसले. अजित पवारांना पाहून कार्यकर्त्यांनी हॅलिपॅडवर गर्दी केली होती.