• Mon. Apr 21st, 2025 3:39:23 PM

    न्यायमंदिरासमोरच अंधश्रद्धेचा कळस! मुंबई हायकोर्टाबाहेर अघोरी प्रकार, खोडसाळपणा की…? गुन्हा दाखल

    न्यायमंदिरासमोरच अंधश्रद्धेचा कळस! मुंबई हायकोर्टाबाहेर अघोरी प्रकार, खोडसाळपणा की…? गुन्हा दाखल

    Mumbai High Court: न्यायालयाच्या आवाराबाहेर मुंबई विद्यापीठ मार्गावर लिंबू, मिरची, नारळ, काळी बाहुली यांची मांडणी करून त्यावर हळद-कुंकू वाहण्यात आले होते.

    महाराष्ट्र टाइम्स
    mumbai hc new

    मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाबाहेर जादूटोणासदृश प्रकार समोर आला आहे. २४ मार्च रोजी न्यायालयाबाहेर लिंबू, मिरची, नारळ आणि काळी बाहुली असे साहित्य मांडून झालेल्या या प्रकाराबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खोडसाळपणा आहे की, कुणी खरेच जादूटोणा केला, याचा तपास पोलिस करीत आहेत.

    उच्च न्यायालय परिसर नेहमीच गजबजलेला असतो. एरव्ही, न्यायालयीन प्रकरणांच्या चर्चेत रंगणाऱ्या न्यायालय परिसरात २४ मार्च रोजी सुनावणीबाह्य विषय चर्चेत होता. न्यायालयाच्या आवाराबाहेर मुंबई विद्यापीठ मार्गावर लिंबू, मिरची, नारळ, काळी बाहुली यांची मांडणी करून त्यावर हळद-कुंकू वाहण्यात आले होते.
    प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचा ‘कचरा’; मुंबईत दोन महिन्यांत २३१२ किलो प्लास्टिक जप्त, ३७ लाखांचा दंड वसूल
    हे वृत्त न्यायालयात पसरले तेव्हा काहींनी अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष केले, तर खरेच जादूटोणा नसेल ना, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकत होती. कर्मचारी, अधिकारी आणि वकिलांना याबाबत कळल्यानंतर सफाईकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे साहित्य उचलण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांनी घाबरून नकार दिला. महापालिका कर्मचारीही हे साहित्य उचलण्यास तयार नव्हते.
    निसर्गाच्या कुशीत उन्नत भ्रमंती! मलबार हिल ‘ट्री टॉप वॉक’चे लोकार्पण, तिकीट किती? काय पाहायला मिळणार?
    न्यायालयाबाहेर करणीचा प्रकार, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर न्यायालयातील अधिकाऱ्यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली. असे साहित्य मांडून अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचे आचरण करून सर्वसामान्यांना भीती वाटावी, या हेतूने हे कृत्य करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी तक्रार न्यायालयातील मूळ शाखेतील मुख्य प्रबंधकांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed