Shivsena UBT Leader Raju Shinde : शिवसेना शिंदे गटाचे फायरब्रँड नेते मंत्री संजय शिरसाट यांना घाम फोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला राम राम ठोकला आहे. शिदेंनी पक्षप्रमुखांना पत्र लिहून मराठवाड्यातील मोठ्या नेत्याच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला दारून पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलीच गळती लागली आहे. कोकणानंतर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा फायरब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या संजय शिरसाट यांना राजू शिंदे यांनी चांगलाच घाम फोडला होता. या निवडणुकीत उबाठा पक्षातर्फे राजू शिंदे यांनी १ लाख ६ हजार मते मिळवली होती. तर शिवसेनेच्या संजय शिरसाठ यांना यांना सहज वाटणारा विजय शेवटच्या टप्प्यात अवघड गेला होता. या निवडणुकीत संजय शिरसाट यांना एक लाख २२ हजार ४९८ मते मिळाली होती. यामुळे संजय शिरसाट यांना सहज वाटणाऱ्या विजयासाठी राजू शिंदेंमुळे चांगलेच दमछाक करावी लागली.
बाळासाहेबांचे विचार राखणार की…; फडणवीसांचं ठाकरेंना थेट आव्हान; उद्याचा दिवस महत्त्वाचा
राजू शिंदे यांनी ठाकरेंकडे राजीनामा लिहून केली तक्रार
राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या राजीनामात म्हटले आहे की उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला होता. आपणही माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली. याबद्दल मी आपला आभारी आहे. परंतु मी काही कारणास्तव तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या बद्दल माझी नाराजी असून मी व माझे सहकारी सर्व समर्थक यांच्यासह शिवसेना पक्षाचा व विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तो आपण स्वीकारावा असे राजू शिंदे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

