• Tue. Apr 15th, 2025 8:10:32 PM
    Pune Crime : पुण्यातील माजी नगरसेविकेच्या मुलावर अत्याचारासह गर्भपात केल्याचा आरोप, आळंदीमध्ये लग्न, पण…

    Authored byहरिश मालुसरे | Contributed by आदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Apr 2025, 12:36 pm

    Pune Crime Marathi News : पुण्यातील माजी नगरसेविकेच्या मुलाने तरूणीवीर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पीडित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शरीरीसंबध ठेवले आणि गर्भधारणा झाल्यावर गर्भपात करायला लावला आहे. आळंदीमध्ये लग्न करत तिला घरी न नेता तिसऱ्यांदा गर्भपातासाठी मारहाण केल्याचं तरूणीने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. प्रकरण काय आहे ते जाणून घ्या.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    आदित्य भवार, पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येताना दिसत आहेत. अशातच पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलाने एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिचा दोनवेळा जबरदस्तीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने खळबळ उडाली असून आरोपी मुलावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण दिलीप नवले (वय २८, रा. नवले ब्रिज, पुणे) असं पीडितेचं नाव आहे. आळंदीमध्ये जाऊन लग्न केल्याचंही पीडितेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या.

    पीडित तरूणी आणि आरोपी करण नवले यांची २०२१ मध्ये एका जिममध्ये ओळख झाली होती. पीडित तरूणीचा व्यवसाय असून दोघांची दिवसेंदिवस मैत्री वाढत गेली. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर करण तरुणीला भेटण्यासाठी जात होता. काही दिवसांनी पीडितेने त्याला विवाहाबद्दल विचारणा केल्यावर तो टाळाटाळ करू लागला. यादरम्यान त्याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यातून तरूणीला तीवेळा वेळा गर्भधारणा झाली होती. यामध्ये फिर्यादीची संमती नसताना 2 वेळा त्याने जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात केला. आता पुन्हा गरोदर असताना तिने तक्रार देऊ नये म्हणून घरच्यांना न सांगता फिर्यादीशी आळंदी येथे लग्न केले. परंतु नांदायला न नेता, तिचा गर्भपात होणेसाठी तिला वारंवार मारहाण करत आहे म्हणून पोलीस स्टेथशनमध्ये तक्रार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    दरम्यान, या प्रकरणातील गुन्हा १९ मार्चला रात्री उशिरा १०.५५ ला नोंदवला गेला आहे. सण 2021 ते 25 आज पर्यंतच्या कालावधीमध्ये फ्लॅट नं ४०२, जी विंग , जी व्ही ७, आंबेगाव पुणे येथे हा प्रकार घडल्याचं पीडितेने सांगितलं आहे. पोलिसांनी बीएनएस कलम ६९, ८८, ३५१(१), अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed