Maharashtra Weather Forecast : राज्यातील तापमानाचं सतत बदल होत असून, अवकाळी पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. चंद्रपूर, लातूरमध्ये पाऊसही झाला. मुंबई, पुणे, कोकणात हवामान सामान्य राहील. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय.
विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या भागांमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह लातूरमध्येही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. या अवकाळी पावसामुळे जरी वातावरण थंड होईल. मात्र, पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाल्याचेही बघायला मिळाले.
Devendra Fadnavis: राज्यात लवकरच विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणादक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबई, पुणे, कोकण, सोलापूरमध्ये सामान्य वातावरण राहिल. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा कोणताही फटका याठिकाणी बसणार नाही. मार्च महिन्यात दोन ते तीन वेळा हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा हा देण्यात आला होता. कोकणात उष्णता वाढताना दिसत होती.
२५ मार्चपर्यंत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलीये. नाशिक आणि खानदेशला देखील अवकाळीचा फटका बसणार नाहीये. बंगालच्या उपसागरातील ९०० मीटर उंचीपर्यंतच्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे व मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात १५०० मीटर उंचीपर्यंतच्या आवर्ती चक्रीय वारे वाहत आहे. यामुळे राज्यातील वातावरणात मोठा बदल झाल्याचे चित्र बघायला मिळतंय. मार्च महिन्यातच काही शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअसपर्यंत पारा गेल्याचे चित्र बघायला मिळाले. मात्र, त्यानंतर आता तापमानात मोठी घट झालीये.

