Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवायला सुरुवात केली आहे. लातूरमध्ये काल गारपीटसह पाऊस पडला. त्यानंतर आज चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे पिंकांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे हे अवकाळी पावसाचे सावट पुढचे दोन दिवस आणखी असण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्हात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसला. मागील काही दिवसांपासून जिल्हातील तापमान वाढले होते. पण आज आलेल्या पावसामुळे उकड्यापासून नागरिकांची सुटका झाली. मात्र या अवकाळी पावसामुळे मिरची, मक्का, भाजीपाला पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाचा पावसाबद्दल अंदाज काय?
सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडतिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आजसाठी वर्तवण्यात आला आहे. यावेळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 किमी प्रतीतास इतका असणार आहे. हा अंदाज काही ठिकाणी खरा ठरताना दिसतोय.
Chitra Wagh यांचा मोठा गौप्यस्फोट, उद्धव ठाकरेंकडून पक्षप्रवेशाची ऑफर
उद्यासाठी नेमका अलर्ट काय?
हवामान विभागाकडून उद्यासाठी देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या या जिल्ह्यांमध्ये काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतीतास असा असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 23 तारखेसाठी यवतमाळला जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना सलग तीन दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. पाऊस पडेल तेव्हा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटदेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाज करण्यात आलं आहे.
Chitra Wagh : ‘माझ्या कॅरेक्टरवर सतत वेडंवाकडं बोलण्याचा प्रयत्न’, चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?
देशातील वातावरणाची स्थिती काय?
दरम्यान, संपूर्ण भारताच्या वातावरणाबाबत सांगायचं झालं तर अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसताना दिसतोय. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक ठिकाणी वातावरणात बदल होणार असल्याचा अंदाज आहे. मध्य आणि पूर्व भारतात पावसाची शक्यता आहे. झारखंड राज्यात सर्वाधिक अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासोबतच ओदिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये काही ठिकाणी वेगवाने वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

