Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची चर्चा अधूनमधून राज्याच्या राजकारणात सुरु असते. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर फडणवीस यांच्याबद्दल ही चर्चा सुरु झाली.
लोकमत समूहाकडून आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी फडणवीसांना दिल्लीबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही दिल्लीला जाणार याकडे अनेक जण डोळे लावून बसलेत, असं जयंत पाटील फडणवीसांना म्हणाले. त्यावेळी समोर प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले होते.Nagpur Violence: नागपूर हिंसाचार प्रकरणातील ५१ पैकी २४ आरोपींबद्दल धक्कादायक माहिती उघड; ‘तो’ संशय खरा ठरणार?
‘नरेंद्र मोदी वयाची पंचाहत्तरी गाठतील. त्यानंतरही ते पंतप्रधानपदी राहावेत अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा असेल. त्यात तुमच्या पक्षातील कोणाच्याही मनात शंका नसेल. पण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस. या सगळ्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस स्वत:ला कुठे पाहतात?’, असा प्रश्न जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
७५ वर्षांची सीमा मोदींनी ठरवलेली असली, तरीही ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. ‘मोदीजी शारीरिकदृष्ट्या फिट आहेत. आता जागतिक पटलावर त्यांनी भारताला नेतृत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे २०२९ मध्येही त्यांनीच पंतप्रधान व्हावं, अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही ती इच्छा त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करु. देवेंद्र फडणवीस पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की त्याला जिथे टाकाल तिथे तो फिट आहे आणि आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे राज्यात दिलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन,’ असं फडणवीस म्हणाले.Nagpur Violence: गडकरींविरोधात निवडणूक लढवली, औरंगजेबावरुन घोषणाबाजी; हिंसाचाराच्या मास्टरमाईंडची कुंडली समोर
मोदीजी, अमितभाई, योगीजी या नेत्यांच्या मांदियाळीत तुम्ही माझं नाव घेतलंत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण मला माझ्या क्षमता माहीत आहेत आणि मर्यादादेखील ठाऊक आहेत. त्यामुळे मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही. मी मुंबईत अतिशय खूष आहे. दिल्लीपेक्षा मुंबईचं वातावरण उत्तम आहे आणि मुंबईत तुमच्यासारखे मित्र आहेत, जे दिल्लीत नाहीत. त्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे, असं फडणवीस यांनी म्हणताच एकच हशा पिकला. त्यावर बरेच जण डोळे लावून बसलेले आहेत की २ वर्षांनी का होईना देवेंद्रजी दिल्लीला जातील. असो, तो भाग वेगळा, असा चिमटा जयंत पाटलांनी काढला.