• Tue. Sep 8th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स


Breaking News In Marathi: नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या राड्यानंतर पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. सध्या नागपुरात सकाळपासूनच तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपुरातील काही भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलिसांनी आतापर्यंत ८० जणांना ताब्यात घेतलं आहे तर नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा,यशोधरानगर आणि कपिलनगर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनातही नागपूरचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed