बीडमधील वाढती गुन्हेगारी आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी परिस्थिती कधीही बीडमध्ये नव्हती असं शरद पवार म्हणाले.बीडमध्ये काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली असं पवार म्हणाले. यावर अंजली दमानिया यांनी पवारांवर पलटवार केला आहे.बीडमध्ये चुकीचं घडवणारी माणसं पवारांच्या तालमीत वाढलेली असून त्यांना पवारांनीच पाठिशी घातलं अशी टीका दमानियांनी केली.