Trimbakeshwar : शासकीय अधिकारी त्र्यंबकेश्वरातील सार्वजनिक न्यासाच्या जमिनी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट व महादेवी मंदिर ट्रस्टच्या जमिनींचा वापर सरकारी उपक्रमांसाठी करण्याचे आयोजन करण्यात येत आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक व भाविक व्यथित आहेत.
शहराच्या हद्दीत त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट आणि ग्रामदेवी महादेवी मंदिर ट्रस्ट या दोन नोंदणीकृत सार्वजनिक न्यासाच्या जमिनी शासनाच्या विचाराधीन असल्याचे दिसून येत आहे. यापैकी त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची जमीन रुग्णालय, भिक्षेकरी निवारा प्रकल्प यासाठी देण्याचे ठरत आहे, तर महादेवी मंदिर संस्थानची जमीन सरकारी कार्यालयाच्या इमारती स्थलांतरित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शहराच्या हद्दीत जिल्हाधिकारी पट्टा, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि वन विभाग यांच्या मालकीचे भूखंड आहेत. यापैकी बहुतांश भूखंड अतिक्रमित झाले आहेत, तर काहींबाबत शासनाचा संबंधित विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. या भूखंडाचा वापर सरकारी उपक्रमाच्या प्रयोजनासाठी करावा, अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे व त्यात काहीही वावगे नाही.
Nagpur News : होळीचा सण साजरा केला अन् घरी जाताना कार दरीत कोसळली, बहीण-भावाची आयुष्यभरासाठी ताटातूटदेवस्थानांना दिलेल्या जमिनी तत्कालीन शासकांनी दिलेल्या इनाम वतनाच्या अथवा भक्तांनी दानात दिलेल्या आहेत. मंदिराची दिवाबत्ती, पूजाअर्चा, स्वच्छता या जमिनींच्या उत्पन्नातून होईल, अशी निखळ भावना यामागे होती. आजघडीला या जमिनींच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाची गरज नसेल, मात्र भविष्यात पुन्हा तशी वेळ येणार नाही, असे ठामपणे सांगता येत नाही. देवस्थानांना संस्थान असे संबोधले जाते व शेकडो वर्ष नेमून दिलेली व्यवस्था अव्याहत सुरू असते. व्यवस्थेचा मूलाधार असलेल्या या जमिनींची विल्हेवाट लावल्यास पुढील पिढी माफ करणार नाही, याची दखल संबंधितांनी घेण्याची आवश्यकता आहे. स्थानिक ग्रामस्थ, भक्त जमिनींबाबत होत असलेल्या निर्णयाने व्यथित होत असल्याचे लोकचर्चेतून स्पष्टपणे जाणवत आहे.
देवास्थांनांच्या जमिनीवर सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याची भावना पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे. या जमिनीवर देवराईसारखे उपक्रम राबवावेत, अशी इच्छा व्यक्त होत आहे. देवस्थानांचे विश्वस्त याबाबत काय निर्णय घेतात याकडे स्थानिकांचे व भाविकांचे लक्ष लागले आहे. शेकडो वर्षांच्या जमिनी वाचाव्यात आणि तेथे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जावेत, अशी नागरिकांची इच्छा आहे.