Ghatkopar Cable Stayed Bridge: रेल्वे ट्रॅक, मेट्रो लाइन 4चा मार्ग आणि बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गावर घाटकोपरमधील केबल-स्टेड पूल बांधला जाणार आहे. जुना रेल्वे पूल पाडून त्याजागी हा बांधण्यात येईल.
मुंबई: मुंबईतील गर्दी असलेल्या उपनगरांमधील वाहतूक सुलभ करण्यासाठी घाटकोपरमध्ये नवा केबल-स्टेड पूल बांधण्यात येत आहे. घाटकोपरमधील पूर्व ते पश्चिम प्रवासासाठी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाशी जोडण्यासठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन संयुक्तपणे या पुलाचं काम बांधकाम करत आहेत. या मार्गामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस मार्ग), अंधेरी घाटकोपर लिंक रोड आणि जोगेश्वरी विक्रोली लिंक रोडवरील कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे.
चार दशकांनंतर नवीन पूल मिळणार
गेल्या चार दशकांपासून घाटकोपर रेल्वे पुलावरून प्रवासी एलबीएस मार्ग ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत प्रवास करत होते. परंतु, २०१८ मधील एका सुरक्षा ऑडिटनंतर हा पूल असुरक्षित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हा मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून वाहनचालकांना जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि अंधेरी घाटकोपर लिंक रोडचा वापर करून प्रवास करावा लागतो. गर्दीच्या वेळी या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या जुन्या रेल्वे पुलाला हटवून एक नवा केबल-स्टेड पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
Weather Update: हवामान विभागाचा टेन्शन वाढवणारा अंदाज जाहीर, महाराष्ट्रात जुलैअखेरीस सरासरीहून कमी पाऊस; ऑगस्टमध्ये स्थिती काय?
पूर्व उपनगरांतील सर्वात पहिल्या केबल-स्टेड पुलांपैकी हा एक असेल. हा पूल मध्य रेल्वेचे ट्रॅक, मेट्रो लाइन ४ आणि बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गावरून जाणार आहे. पुलाचा बहुतांश भाग केबल-स्टेड असेल. पण बुलेट ट्रेन आणि एलबीएस मार्गावरील पट्टा ‘बोस्ट्रींग स्टील स्पॅन’च्या सहाय्याने बांधला जाईल. तसेच, पादचाऱ्यांसाठी पुलावर पदपथही असतील.
कुठून-कुठे जोडणार?
हा केबल-स्टेड पूल गोळीबार रोड जंक्शनपासून ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत बांधला जाईल. १०८ मीटर लांब पुलावर ९२ मीटर ‘बोस्ट्रींग स्टील स्पॅन’ असतील. एलबीएस मार्गावरील स्पॅन ९० मीटर असतील. रेल्वे पुलाखाली सर्व्हिस रोड बांधण्याची योजना आहे. २०२७ पर्यंत या पुलाचं काम पूर्ण करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे.
या पुलामुळे पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या फायद्यासाठी या पुलाचं काम टप्प्या-टप्प्याने केलं जाईल. उजव्या बाजुचं काम पूर्ण झालं या मार्गावर वाहतूक सुरू करून मग दुसऱ्या बाजुचं काम सुरू करण्यात येईल अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. या पुलाचं काम पूर्ण झाल्यावर साकीनाका, मरोळ आणि मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना AGLRवरून जावं लागतं होतं. यामुळे AGLR जंक्शन आणि पंत नगरमधील कोंडी फुटणार आहे.
Pune News: पुण्यात १२ ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांचं बांधकाम सुरू; ४५९ किमी लांब नेटवर्क; एका वर्षात काम करण्याचं उद्दिष्ट
गोळीबार मार्ग आणि घाटकोपर पश्चिमेकडून येणारी वाहनं एलबीएस मार्गावर कोंडी अडकतात. या पुलामुळे ही कोंडी बायपास करून प्रवास करता येणार आहे. दरम्यान, पूर्व द्रुतगती महामार्गावरून पश्चिम उपनगरात जाणारे प्रवावीस JVLRचा प्रामुख्याने वापर करत असल्यामुळे गांधीनगर आणि विक्रोळी येथे कोंडी होते.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा