• Tue. Sep 15th, 2026

Gunaratna Sadavarte : ‘टोल टोल टनाटन’, गुणरत्न सदावर्ते यांची राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका

Gunaratna Sadavarte : ‘टोल टोल टनाटन’, गुणरत्न सदावर्ते यांची राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका

Gunaratna Sadavarte slams Raj Thackeray : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांचा एकेरी शब्दांत उल्लेख करत इथे प्रांतवाद करायचा नाही, असा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : राज्यभरात आज होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून आज रंगाची उधळण करुन आनंद लुटण्यात आला. या दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील धुलिवंदन साजरी केली. पण यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. “टन टनाटन टोल हैं भाई, टन टनाटन टोल. टोल के माल बोल भाई, टोल के माल बोल”, अशी खोचक टीका सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषेत टीका केली. त्यांच्या या टीकेवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सदावर्ते काय म्हणाले?

“राज ठाकरेने एक लक्षात ठेवलं पाहिजे. या राज्यात तू आता यापुढे कोणत्याही परिस्थितीत वाद लावण्याच्या भानगडीत पडायचे नाही. भाषा ही स्वतंत्र आहे. प्रशासकीय भाषा वेगळी असू शकेल. पण भाषेवर कुणाचंही बंधन असू शकत नाही. ते जे चिलेपिल्ले पोरं दुकानात जावून, व्यापाऱ्यांकडे जावून, एअरटेल शॉप्समध्ये जावून जे त्रास देत आहेत ना, ते आज या होळीच्या निमित्ताने जाळून टाका राज ठाकरे. प्रांतवाद जाळून टाकायचा. इथे भाषावाद करायचा नाही”, असं गुणरत्न सदावर्ते राज ठाकरे यांना उद्देशून म्हणाले.
मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित तथा सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची न्यायाधीशांसोबत धुलीवंदन साजरी?
“राज ठाकरेंवर काय बोलायचं? कारण मी म्हणेन, राज ठाकरे तुम्ही एक करा. टोल टोल टनाटन. टोल के उपर गिनो भाई. पण राज ठाकरे हे लक्षात ठेवा, भाषेच्या आधारावर आपली पोळी शेकू नका”, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. राज ठाकरेंच्या या टीकेवर अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं.
Honey Trap : ‘बुलाती है, मगर जाने का नहीं’, हनीट्रॅपमध्ये फसला, भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या महिलेला पुरवली

अमेय खोपकर काय म्हणाले?

“कोण गुणरत्न सदावर्ते? ते कर्जतमधून बोलतात की कसाऱ्यावरुन? त्यांच्यामागे बुजगाणं उभं असतं, बुगूबुगू करत एक प्राणी उभं असतं. ही ह्यांची पात्रता. ह्यांची लायकी काय? महाराष्ट्रासाठी ह्यांनी काय केलं? आज कशाला राजकारण करताय? आज रंगाचा बेरंग कुणी करु नये”, असा सल्ला अमेय खोपकर यांनी दिला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed