• Sun. Mar 8th, 2026

    Satish Bhosale : सुरेश धस यांचा कार्यकर्ता गुंड खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या विरोधात सर्वात मोठी कारवाई

    Satish Bhosale : सुरेश धस यांचा कार्यकर्ता गुंड खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या विरोधात सर्वात मोठी कारवाई

    Police Demolished Satish Bhosale House : खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर आज पोलीस आणि वन विभागाने थेट बुलडोझर चालवला आहे. खोक्याने वन विभागाच्या जागेवर घर बांधलं होतं. त्यामुळे त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड : खोक्या उर्फ सतीश भोसले याच्याविरोधात वन विभाग आणि पोलीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. सतीश भोसले याचा पोलीस अनेक दिवसांपासून शोध घेत होते. तो पोलिसांना सातत्याने चकवा देत पळत होता. अखेर तो पोलिसांना प्रयागराज येथे सापडला आहे. पोलिसांनी त्याच्या प्रयागराज येथून मुसक्या आवळल्या आहेत. त्याला बीडला आणलं जात आहे. यानंतर त्याला बीडच्या शिरुर कासार कोर्टात हजर केलं जाईल. तिथे खोक्याची पोलीस कोठडी मागितली जाईल. यावेळी पोलिसांकडून खोक्याने आणखी काही गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करतील. विशेष म्हणजे खोक्या सापडल्यानंतर पोलीस आणि वन विभाग चांगलंच अॅक्शन मोडमध्ये आलं आहे.

    खोक्या उर्फ सतीश भोसले याचं घर हे वन विभागाच्या जागेवर बांधण्यात आलं आहे. त्यामुळे वन विभागाने खोक्याला नोटीस बजावली होती. पण 48 तासांनंतरही नोटीसला उत्तर न आल्याने वन विभागाने कारवाई सुरु केली आहे. वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा शिरुर कासार येथे सतीश भोसले याचं घर असलेल्या ठिकाणी दाखल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून सतीश भोसले याच्या घरातील सामान बाहेर काढला जातोय. तसेच कारवाईसाठी बुलडोझर देखील सतीश भोसले याच्या घराबाहेर आणण्यात आलं आहे.
    Nitesh Rane : महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवली जाणार? मंत्री नितेश राणे यांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
    सतीश भोसले याचं घर असलेल्या परिसरात त्याची मोठी दहशत होती, अशी चर्चा आहे. सतीश भोसले याच्या घराबाहेर भारतीय जना पार्टी प्रदेश कार्यालय असं लिहिलंआहे. तसेच आय लव्ह माय होम असं घराच्या उजव्या बाजूला लिहिलेलं आहे. तसेच सतीश भोसले याचं घर आतमधून प्रशस्त दिसत आहे. या घराच्या भिंती काचेसारख्या दिसत आहेत. पण आता त्या सर्व जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.
    MNS Protest : LIC ला मराठीचं वावडं? इंग्रजी, गुजरातीला प्राधान्याचा दावा, मनसे आक्रमक, माफीनाम्याची मागणी

    खोक्यावर वन विभागाकडून दोन गुन्हे दाखल

    वन विभागाकडून सतीश भोसले याच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सतीश भोसले याच्या घरात ज्याप्रमाणे प्राण्यांचे मांस आढळलं होतं त्याप्रकरणी त्याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच वन विभागाच्या जागेवर सतीश भोसले याने घर बांधलं. यावरुन त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed