Pune Swargate ST Depot Assault Case : स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली
स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. आरोपीविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपी दत्तात्रय गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी बुधवारी दुपारी चेहऱ्यावर काळे कापड बांधून न्यायालयात हजर केले.
फॉरेन्सिक तपासणी
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गाडेला स्वारगेट येथील घटनास्थळी; तसेच मूळ गावी गुनाट येथे नेण्यात आले. तेथे तो ज्या शेतात लपून बसला, त्याची पाहणी करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत तीस साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. याशिवाय आरोपीचे वीर्य, रक्त, नख आणि केस याचे नमुने संकलित करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. आरोपी आणि तक्रारदार तरुणीची डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले आहेत. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली असली, तरी तिचा अंतिम अहवाल अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही.Pune Crime : अनैतिक संबंधात अडथळा, पुण्यात महिलेने बॉयफ्रेण्डच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला, ॐ च्या टॅटूमुळे गेम फिरला
तपासादरम्यान पोलिसांनी गाडेच्या घराची झडती घेतली. गुन्ह्याच्या दिवशी गाडेने वापरलेला मोबाइल अद्याप सापडलेला नसून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मोबाइलमध्ये असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.Pune Boy Death : निनाद अजून कसा आला नाही? कुटुंब काळजीत, रात्रीच्या काळोखात शोधाशोध, पुण्यात ६ वर्षांच्या लेकराचा बुडून मृत्यू
दरम्यान, गाडेची पोलिस कोठडीत चौकशी करण्याचा अधिकार राखून ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी शैलेश संखे आणि सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी न्यायालयाकडे केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला कपडे पुरविण्याची मागणी केली; तसेच आरोपीशी बोलण्याची संधी देण्याची विनंती केली. गाडेतर्फे अॅड. सुमीत पोटे आणि अॅड. वाजेद खान-बीडकर यांनी बाजू मांडली, तर पीडितेतर्फे अॅड. असीम सरोदे यांनी बाजू मांडली. या वेळी न्यायालयाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर सायंकाळी त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
दरम्यान, पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील एसटी बस स्थानकांमधील अस्वच्छता, असुरक्षितता यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.