Satish bhosale arrested : सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याच्या शोधात गेल्या काही दिवसांपासून पोलिस होते. शेवटी आता त्याला अटक करण्यात यश आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले हा फरार होता. अत्यंत क्रूरपणे मारहाण करताना सतीश भोसले हा एका व्हिडीओमध्ये दिसला. ज्यानंतर मोठी टीका करण्यात आली.
सतीश भोसले याच्या अटकेबद्दल बोलताना सुरेश धस हे म्हणाले की, अत्यंत चांगली बाब आहे, त्याला अटक झालीये. त्याने चूक केली त्यामुळे आता त्याला कायद्याप्रमाणे कारवाई होईल. मी कोणत्याही पोलिसाला फोन केला नाही. त्याने चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि त्याच्यावर कारवाई झालीये. आता त्याला अटक झालीये. पोलिसांनी जी कलमे लागली आहेत, त्यानुसार त्याच्यावर पुढील काय ती कारवाई करतील.
‘खोक्या’च्या नावाने पाथर्डीत एक कोटीची खंडणी, सतीश भोसलेचे पाय खोलात?सतीश भोसले ऊर्फ खोक्याला बीड पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केलीये. खोक्याचे शेवटचे लोकेशन हे प्रयागराज पोलिसांना मिळाले. यानंतर बीडचे पोलिस प्रयागराजमध्ये गेले. उत्तर प्रदेश आणि बीडच्या पोलिसांनी मिळून खोक्याच्या मुसक्या आवळल्या. सतीश भोसले याला आता बीडमध्ये आणले जाईल आणि कोर्टात हजर केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून खोक्या फरार होता.
सहा दिवसांनंतर पोलिसांना सतीश भोसले सापडला. हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी सतीश भोसले हा फरार होता, त्यावेळी त्याने tv9 ला मुलाखत दिली होती, यामुळे पोलिसांवर जोरदार टीका केली जात होती. सुरेश धस यांनी अगोदरच मान्य केले होते की, मी सतीश भोसले याला ओळखतो. तो माझ्याकडे कधी कधी फोटो काढण्यासाठी येतो. सतीश भोसले याच्या अटकेनंतर अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

