• Sun. Jun 14th, 2026

    Amol Kolhe : बुऱ्हाणपूरमध्ये ‘औरंगजेबाचा खजिना’ लुटण्यासाठी शेकडो नागरिकांनी खड्डे खोदले, अमोल कोल्हे म्हणाले…

    Amol Kolhe : बुऱ्हाणपूरमध्ये ‘औरंगजेबाचा खजिना’ लुटण्यासाठी शेकडो नागरिकांनी खड्डे खोदले, अमोल कोल्हे म्हणाले…

    People dug holes for treasure in burhanpur : “मोठ्या पडद्यावर जे काही आलं त्याचं इम्प्रेशन मनात ठेवून असं काही होत असेल तर आपण नेमकं कोणत्या दिशेला चाललोय? हा विचार करणं देखील गरजेचं आहे. पडद्यावर एखादी गोष्ट दाखवली म्हणून खोदकाम झालं असेल तर हे खरंतर हास्यास्पद आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    भोपाळ : बुऱ्हाणपूर पासून 14 किमी अंतरावर असिरगड आहे. या असिरगडाचा मोठा इतिहास आहे. याच असिरगडावर औरंगजेबाची छावणी होती. या गडावर मुघल सरदार, त्यांचे सैन्य यांची मोठी वर्दळ असायची. या गडावर आणि आजूबाजूच्या परिसरात मुघलांनी मोठा खजिना पुरल्याची अफवा समोर आली आणि हजारो नागरिकांनी असिरगडावर गर्दी केली. यावेळी मुघलांनी कथितपणे लपवलेला खजिना शोधून काढण्यासाठी नागरिकांमध्ये स्पर्धा लागली. शेकडो नागरिकांनी असिरगडावर खड्डे खोदले. विशेष म्हणजे असिरगडाच्या आजूबाजूच्या परिसरातही नागरिकांनी शेतामध्ये खड्डे खोदले आहेत. पण कुणाच्याही हाती काही लागल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    पूर्वी राजे, महाराजे, व्यापारी आपली संपत्ती जमिनीखाली गुप्त धन म्हणून पुरत असायचे, अशा गोष्टी आपण अनेकदा ऐकल्या आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांना कठीण काळात मदत व्हावी म्हणून अशाप्रकारचे गुप्त धन जमिनीत पुरलं जायचं, असं आपण अनेक कथांमध्ये ऐकलं असेल. तसेच अनेकदा उत्खननातून अशा गोष्टी याआधी सापडल्या देखील आहेत. पण याचा अर्थ औरंगजेबाची जिथे छावणी होती तिथे खजिना सापडेल, असा होत नाही. पण कुणीतरी असिरगडावर आणि आजूबाजूच्या परिसरात जमिनीत सोनं पुरल्याची अफवा पसरवली. विशेष म्हणजे छावा चित्रपटाच्या कथेला या गोष्टीशी जोडून अफवेला आणखी पेव फुटला. त्यामुळे नागरिकांची मोठी झुंबड उडाली.
    Pune : ‘त्याने सिग्नलवर नाही, तर माझ्या तोंडावर लघुशंका केली’, संतापलेल्या पित्याची उद्विग्न प्रतिक्रिया
    असिरगडाजवळ महामार्गाचे देखील काम सुरु आहे. हे काम सुरु असताना काही दिवसांपूर्वी जुने नाणी सापडल्याची चर्चा होती. यामुळे देखील नागरिकांनी परिसरात उत्खनन करण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या अशाप्रकारच्या वागणुकीवर खासदार अमोल कोल्हे यांनी ‘झी 24 तास’ला प्रतिक्रिया दिली. आपण कोणत्या दिशेला चाललोय? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
    Pune : पुण्यात वातावरण तापलं, अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजाच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये महिलांची धडक

    अमोल कोल्हे काय म्हणाले?

    “मोठ्या पडद्यावर जे काही आलं त्याचं इम्प्रेशन मनात ठेवून असं काही होत असेल तर आपण नेमकं कोणत्या दिशेला चाललोय? हा विचार करणं देखील गरजेचं आहे. पडद्यावर एखादी गोष्ट दाखवली म्हणून खोदकाम झालं असेल तर हे खरंतर हास्यास्पद आहे. कारण बुऱ्हाणपूर हे त्यावेळी मुघलांचं दख्खनातील मुख्य ठाण होतं. यापूर्वी असे प्रकार झाले आहेत का? याचीदेखील शाहानिशा करणं गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed