Beed Video : बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात अमानुष मारहाणीचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. एका व्यक्तीला निर्घृण मारहाण करतानाचा हा व्हिडीओ आहे. या प्रकरणात अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात अमानुष मारहाणीचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. एका व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण करतानाचा हा व्हिडीओ आहे. या प्रकरणात अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच मारहाण झालेल्या व्यक्तीचे नावही समोर आलेले नाही. मात्र या मारहाणीचा व्हिडीओ सुन्न करणारा आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांचं मोठं वक्तव्य
मारहाण करणारा सुरेश धस यांचा कार्यकर्ता
या व्हिडीओत अज्ञात व्यक्तीकडून पीडित व्यक्तीला अत्यंत अमानुष पद्धतीने तळपायावर बॅटच्या साह्याने मारले जात आहे. हे अत्यंत धक्कादायक असून अमानुष पद्धतीने मारहाण केली जात आहे. बॅटने मारहाण करणारा व्यक्ती भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. तसेच संबंधित व्यक्तीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेत जे कोणी मारहाण करणारे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
सुरेश धस काय भूमिका मांडणार?
दरम्यान, या घटनेवर आता सुरेश धस यांच्याकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं आहे. सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंदोलन केलं. या प्रकरणात त्यांनी अनेक खुलासे देखील केले. त्यांनी पीडित देशमुख कुटुंबियांना मदत देखील केली. पण दुसरीकडे त्यांच्याच कार्यकर्त्याडकडून कुणाला इतक्या निर्घृणपणे मारहाण होत असेल तर त्यावर सुरेश धस यांची भूमिका काय? हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे.

