• Sun. Jul 12th, 2026

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवांना जातवैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय लवकरच – आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 5, 2025
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवांना जातवैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय लवकरच – आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके – महासंवाद




    मुंबई,दि. 5 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणासोबत  बैठक घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊ, असे आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी सांगितले.

    लोहगड निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे, आमदार चित्रा वाघ, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, सिंधुदुर्गचे ठाकर आदिवासी समाजाचे अध्यक्ष शशांक अटक, पद्मश्री परशुराम गंगावणे, दिलीप म्हस्के यावेळी उपस्थित होते.

    आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके म्हणाले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विभागाने कार्यवाही करावी. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये. तज्‍ज्ञ समितीकडून सूचना घेऊन याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्गातील ठाकर समाजातील समाजबांधवाना आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जात पडताळणी समितीकडे समाजबांधवानी प्रस्ताव दिल्यानंतर जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव प्रलंबित राहू नयेत. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागामध्येही रक्तनाते संबधामध्ये जातवैधता प्रमाणपत्र देण्यात यावीत.  याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

    ००००

    संध्या गरवारे/विसंअ







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed