• Sun. Jul 12th, 2026
    Vinayak Raut : ‘…तर आम्ही तीन वर्ष थांबलो नसतो, आमच्या मुलीचा गैरफायदा’; पीडित सुनेच्या आईची मोठी मागणी, काय म्हणाल्या?

    Vinayak Raut Daughter-in-Law Mother Reaction : विनायक राऊतांवर त्यांच्या सुनेनं केलेल्या आरोपानंतर त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर पीडित सुनेच्या आईने प्रतिक्रिया देत मोठी मागणी केली आहे.

    गिरीजा राऊत आई प्रतिक्रिया(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊतांच्या सूनेनं यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गितेशची शारीरिक अक्षमता

    ‘गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला’, असा आरोप पीडित सुनेनं केला आहे. पीडित सुनेनं पती गितेश राऊतांसह त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, ‘2017 ते 2018 पर्यंत गितेश आणि आपल्यात कुठलेच शारिरीक संबंध नव्हते. गितेशची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याचा’, आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, सुनेचे सगळे आरोप विनायक राऊतांनी फेटाळून लावले आहेत.
    Maharashtra TimesBeed Crime : आचारीचं काम करुन घरी परतताना रस्त्यात गाठलं, क्षुल्लक वादातून मित्राला संपवलं, बाकी मित्रांनी साथ सोडली; बीडमध्ये नेमकं काय घडलं?

    पीडिते सुनेच्या आईची मोठी मागणी

    ‘आम्ही विनायक राऊतांच्याही अटकेची मागणी करत आहोत. आज विनायक राऊत आरोप करत आहेत. टेरेस फ्लॅट मागितला 5 लाख मागितले. आम्ही मिटिंगसाठी वेळ मागत होतो. विनायक ⁠राऊतांच्या घराची मुलगी आहे, आरोप करताना विचार करावा. मुलगी माहेरी आल्यापासून आम्ही मिटिंगसाठी वेळ मागत आहोत. आम्ही 3 वर्षे गाठीभेटीसाठी वेळ मागत होतो. आपला मुलगा काय करतो हे त्यांना माहिती आहे. विनायक राऊत यांचा मुलगा घाणेरड्या शिव्या देतो. मानसिक त्रास देतो. आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला’, असं पीडित सुनेच्या आईने म्हटलं आहे.
    पीडित सुनेच्या आई पुढे म्हणाल्या की, ‘आम्ही पैशांची मागणी केली हे चुकीचं आहे. आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही 3 वर्षे थांबलो नसतो. राजकीय पातळी त्यांची चांगली असल्यानं आम्ही काही बोललो नाही. आम्हाला फक्त मुलगी चांगली रहावी, ही इच्छा आहे. आम्ही हे समोपचाराने मिळवण्यासाठी बोलत होतो. शारीरिक संबंध होणार नाहीत, तर मुलं होणार कशी?’, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ‘तसेच माझ्या मुलीला धमकावलं जात होतं. फोनवर बोलतानाही फोन स्पिकरवर ठेवण्यास तिला धमकावलं जात’, असल्याची प्रतिक्रिया आईने दिली आहे.
    Maharashtra TimesVinayak Raut: पतीने संबंध ठेवण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप, सुनेसोबत नेमकं काय घडलं? विनायक राऊतांची पहिली प्रतिक्रिया

    विनायक राऊत काय म्हणाले?

    ‘मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि त्याची पत्नी एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असं सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातच काही काळं आहे. प्रत्येकवेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे’, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा