Maharashtra Accident News today : फार्मसी महाविद्यालयामध्ये जात असताना ममुराबाद बायपास रस्त्यावर वीटांनी भरलेल्या भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली.
ही घटना आज शनिवारी (दि.१) सकाळी घडली. फैजल मुस्ताक पटेल (वय २०, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. वासिक खान युसुफ खान (वय २०) हा तरुण यत गंभीर जखमी झाला आहे.
फैजल मुस्ताक पटेल आई-वडील यांच्यासह मास्टर कॉलनी येथे राहत होता. फैजलच्या वडील हातमजुरी करतात. फैजल पटेल हा अरुणाबाई फार्मसी महाविद्यालय येथे तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता.
भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक
दरम्यान, आज शनिवारी फैजल पटेल हा त्याचा वर्गातील मित्र वासिक खान युसुफ खान याच्यासोबत ममुराबाद येथील फार्मसी महाविद्यालयामध्ये जात असताना ममुराबाद बायपास रस्त्यावर वीटांनी भरलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमध्ये फैजल पटेल व वासिक खान गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी आलेल्या ग्रामस्थांनी दोघांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केले. मात्र, रुग्णालयात नेतांनाच फैजलच प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर वासिक खान याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Pune Crime : स्वारगेट डेपो अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, सहमतीने संबंध, पैशांवरुन वाद झाल्यामुळे आरोप, रुपाली पाटलांचा दावा
महाविद्यालयीन तरुणाच्या मृत्यूमुळे मास्टर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या अपघातप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.
Nagpur News : लग्न ठरल्यावर सहमतीने शरीरसंबंध, पत्रिका वाटताना वराचा भीषण अपघात, लग्न मोडताच अमरावतीच्या तरुणीने…
वर्ध्यात भाविकांचा अपघात
दुसरीकडे, प्रयागराजवरून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरला वर्ध्याजवळ मंगळवारी सकाळी अपघात झाला. यात ट्रॅव्हलरमधील १४ भाविक जखमी झाले. कर्नाटकच्या बिदर येथील भाविक ट्रॅव्हलरने प्रयागराजला गेले होते. नागपूर-तुळजापूर मार्गावरून परत जात असताना ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये धडक झाली. अपघातात जखमी भाविकांना तातडीने सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

