Nana Bhangire on Sanjay Raut :माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला स्थायी समितीचे सदस्य पद देताना आणि शहराध्यक्ष होताना तत्कालीन संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी २५ लाखांची मागणी केली होती, असं नाना भानगिरे म्हणाले
माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला स्थायी समितीचे सदस्य पद देताना आणि शहराध्यक्ष होताना तत्कालीन संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी २५ लाखांची मागणी केली होती. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी ही संजय राऊत यांच्याकडे होती. यातील पाच लाखांची एंट्री सुद्धा झालेली आहे, असा गंभीर आरोप नाना भानगिरे यांनी संजय राऊत आणि बाळा कदम यांच्यावर केला आहे. तसेच मला सगळी अंडीपिल्ली माहित आहेत, ती काढायला लावू नका. तुमचे बेताल वक्तव्य अगोदर थांबवा, असा इशारा सुद्धा नाना भानगिरे यांनी दिला आहे.
Indrajit Sawant : ‘छावा’विरोधात मत मांडलं, म्हणून मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरटकर धमकी देतोय, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी ऑडिओ क्लीप ऐकवली
तर, संजय राऊत हे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करत आहेत. भविष्यात त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, त्यांना काळे फासू, असा थेट इशारा भानगिरे यांनी दिला आहे. त्याबरोबरच नीलम गोऱ्हे यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा अपमान आहे. असं देखील नाना भानगिरे म्हणाले आहेत.
Operation Tiger : आधी ठाकरेंना सोडलं, आता ‘स्वाभिमानी’ निर्णय, कोल्हापूरच्या माजी आमदाराचा मोठा झटका
काय म्हणाले होते संजय राऊत?
नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई आहेत. नीलम गोऱ्हे यांचे कालचे विधान म्हणजे त्यांची विकृती आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ही कोणती बाई तुम्ही पक्षात आणली? काही लोकांच्या मर्जीमुळे त्या आल्या अन् गेल्या. परंतु जाताना ताटात घाण करुन गेल्या. त्यांचे विधान परिषदेतील कर्तृत्व काय? त्यांनी कोणकोणाच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा केले, असा प्रश्न संजय राऊत यांनी काल विचारला होता

