• Tue. Mar 10th, 2026

    Sanjay Raut Challenged Eknath Shinde :’एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून फक्त…’; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

    Sanjay Raut Challenged Eknath Shinde :’एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून फक्त…’; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

    Sanjay Raut Challenged Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नवीन पक्ष स्थापन करून पाच आमदार निवडून आणण्याचं आव्हान दिलं आहे. राऊतांनी शिंदेंना खऱ्या-खोट्या शिवसेनेबद्दल प्रश्न विचारत नवीन चिन्हावर निवडणूक लढण्याचं आवाहन केलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेना आव्हान

    मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान (Sanjay Raut Challenged Eknath Shinde) दिलं आहे. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) नवीन पक्ष स्थापन करत फक्त पाच आमदार निवडून आणून दाखवण्याचं आव्हान संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिलं आहे. इतकंच नाहीतर पक्ष नाही स्थापन केला तर चिन्ह परत करावं आणि निवडणूक लढवावी, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना राऊतांनी विखे पाटलांवरही जहरी शब्दात टीका केली आहे. दहावेळा साड्या बदलणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये, असं म्हणत राऊतांनी विखेंवर निशाणा साधला.

    एकनाथ शिंदे एक डरा हुआ आदमी, लोहपुरूष कोण अमित शहा? मग बाळासाहेब ठाकरे कोण, लाचार आहेत हे सगळे घाबरलेले आहेत. खरी शिवसेना कोणती खोटी कोणती हे अमित शहा सत्तेत नसतील तेव्हा कळेल. आज दहशत दबाव , पैशाची ताकद आणि निवडणूक आयोग त्यांच्या हातात आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार निवडून आणून दाखवावेत. इतकंच काय त्यांनी चोरलेलं चिन्ह परत द्यावं आणि नवीन चिन्हावर निवडणूक लढून दाखवावी. बाळासाहेबांच्या घरात चोऱ्या माऱ्या करता आणि अमित शहांची दादागिरी दाखवता. अमित शहा आणि मोदी हे अमृत पिऊन नाही आले कधी ना कधी जायचंच आहे, त्यावेळी जनता निर्णय घेईल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंना आव्हान दिलं.
    माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी जितेंद्र आव्हाड आक्रमक
    जे दहावेळा पक्ष सोडून गेलेत, त्यांना पहिलं मंत्रीपद उद्धव ठाकरेंनी दिलं आहे त्यांच्या वडिलांनासुद्धा हे त्यांनी विसरू नये.
    दहावेळा साड्या बदलणारे लोकं आहेत हे, त्यांनी आम्हाला शिकवू नये. आपण मातोश्रीवर येत होतात आणि जात होतात. तुम्हालाही धक्के बसतील, धक्का बसू नये म्हणून तुम्ही पक्ष बदलता. हिंमत असती तर पक्ष बदलले नसते. ज्या काँग्रेसने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या शिवसेनेनेही तुम्हाला सर्व काही दिलं त्यांच्याबद्दल असं बोलता म्हणत संजय राऊतांनी विखे पाटलांवर निशाणा साधला.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed