Mumbai Drugs Smuggling Case : गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, दादर रेल्वे स्थानकाजवळील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकण्यात आला. तेथून पोलिसांनी जहांगीर शेख आणि सेनुअल शेख या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ किलो ४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे १० कोटी ८ लाख रुपये आहे.
गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, दादर रेल्वे स्थानकाजवळील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकण्यात आला. तेथून पोलिसांनी जहांगीर शेख आणि सेनुअल शेख या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ किलो ४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे १० कोटी ८ लाख रुपये आहे. या अमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कमधील इतर सदस्यांची माहिती मिळविण्यासाठी, अटक केलेल्या आरोपींची पोलिस कसून चौकशी करत आहेत.
पोलिसांनी केलेल्या झडतीत असे दिसून आले की, आरोपी जहांगीर शेख प्लास्टिकच्या झाडूंमध्ये अमली पदार्थ लपवून तस्करी करत होता. त्याने अमली पदार्थाने भरलेली ही झाडू दुसऱ्या आरोपी सेनुअल शेखच्या घरी लपवली होती. पोलिसांना खबर लागताच गुन्हे शाखेचे पथक तिथे पोहोचले आणि त्यांनी ही झाडू जप्त करुन पंचनामा केला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपींनी हुशारीने अमली पदार्थ झाडूमध्ये लपवले होते. सध्या पोलीस या नेटवर्कशी संबंधित इतर लोकांचा पोलिस शोध घेत आहेत.
या आरोपींना अमली पदार्थ पुरवणाऱ्या मुख्य पुरवठादाराचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणात, माटुंगा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(सी) आर/डब्ल्यू 22(सी), 29 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आणि पुढील तपास सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, अमली पदार्थ तस्करीच्या या अनोख्या पद्धतीचा खुलासा झाल्यानंतर, पुरवठा साखळीशी संबंधित इतर लोकांचीही चौकशी केली जात आहे. आणि लवकरच आणखी लोकांना अटक होऊ शकते.