• Mon. Jul 6th, 2026

    डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 18, 2025
    डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद




    मुंबई, दि.१८: अल्पसंख्याक विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेमध्ये पात्र मदरशांना पायाभूत सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करून जास्तीत जास्त रु. १०.०० लाख इतक्या मर्यादपर्यंत अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    “डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांना दि. २२ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत प्रस्ताव मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे. अल्पसंख्याक विकास विभागातील तरतुदीनुसार अटी व शर्तीची पुर्तता करणा-या मदरसांचे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाईल. ज्या मदरसांना Scheme for Providing Quality Education in Madrasa (SPQEM) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed