ranveer allahbadia News : रणवीर अलाहबादिया याने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्याने त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत त्याचा पोलिसांशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्याला दोन समन्स दिले गेले आहेत.
रणवीर अलाहबादियाचा संपर्क होईना
आता रणवीर अलाहबादिया हा संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. फोन बंद केल्यामुळे त्याच्यासोबत कोणताच संपर्क होऊ शकल नाहीये. रणवीर अलाहबादियाच्या घराला देखील सध्या कुलूप आहे. हेच नाहीतर रणवीरच्या वकिलांसोबत देखील पोलिसांचा संपर्क होऊ शकत नाही. कोणताही संपर्क होऊ शकत नसल्याने पोलिसांनी आता रणवीर अलाहबादियाला समन्स बजावला आहे. रणवीर पोलिसांकडून दोन समन्स बजावण्यात आली.
धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या गुप्त भेटीवर मनोज जरांगे संतापले, आण्णा एवढा विश्वासघात…पोलिसांची एक टीम रणवीरच्या घरी
ज्यावेळी रणवीर अलाहबादियाकडून समन्सला प्रतिसाद दिला जात नव्हता. त्यावेळी पोलिसांची एक टीम त्याच्या घरी गेली असता त्याच्या घराला कुलूप दिसले. आता पोलिसांकडून तिसऱ्यांदा रणवीर अलाहबादियाला समन्स पाठवला जाईल. त्यानंतर रणवीर हा चाैकशीसाठी हजर झाला नाही तर त्याला अटकही होऊ शकते. रणवीर अलाहबादिया याने सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली. मात्र, त्याला सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही.
रणवीर अलाहबादियाच्या अडचणीत मोठी वाढ
रणवीर अलाहबादिया समय रैनाच्या शोमध्ये आला होता. या एपिसोडदरम्यान त्याने एका स्पर्धकाला त्यांच्या पालकांच्या लैंगिक संबंधांबद्दल वादग्रस्त प्रश्न विचारला. याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आणि त्याच्यावर टीका करण्यात आली. रणवीर आणि समय यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. वाढता वाद पाहून रणवीरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून माफीही मागितली. मात्र, अजूनही लोकांमधील संताप कायम आहे.

