• Thu. Sep 10th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

साई नामाचा जयघोष, शिर्डीत साई परिक्रमा महोत्सवास भाविकांचा उदंड प्रतिसाद

शिर्डी साई परिक्रमा महोत्सवास भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असुन देश विदेशातील हजारो भाविक या पायी परिक्रमेत ‌सहभागी झाले आहेत. महिला भाविकांची संख्या देखील लक्षणीय आहे.14 किलोमीटर असलेली ही परिक्रमा लक्षवेधी ठरलीय.शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्ररथावरील देखावे , ढोल – ताशांचा गजर अशा थाटात खंडोबा मंदिरापासुन सकाळी साडेपाच वाजता परिक्रमेस सुरूवात झाली. साईबाबा हयात असताना शिर्डी गावच्या शिवेची परिक्रमा करत होते असा उल्लेख साईबाबांच्या‌ जिवनावर आधारीत साईसतचरित्र ग्रंथात आढळतो. त्या धर्तीवर शिर्डी ग्रामंस्थांच्या वतीने सहा वर्षापूर्वी साई परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला. ग्रामस्थच नव्हे तर शालेय विद्यार्थी , शिक्षक तसेच राज्य आणि विदेशातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed