Tanaji Sawant Son Kidnap : ग्लोबल फ्लाईट हॅडलिंग सर्व्हिसेस कंपनीकडून खासगी विमान आरक्षित केले होते. त्यासाठी ७८ लाख ५० हजार रुपये शुल्क आकारले होते. विमानात ऋषिराज, दोन मित्र तसेच महिलेसह तीन पायलट होते.
तानाजी सावंत यांच्या मुलाच्या तथाकथित अपहरणाचे नाट्य सोमवारी सायंकाळी रंगले होते. सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंतांचे नर्हे परिसरातून अज्ञातांनी कारमधून अपहरण झाल्याचा कॉल पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान प्राप्त झाला. ही बाब सावंत यांना समजल्यानंतर त्यांनी विचारपूस सुरू केली. चालकाकडे विचारणा केल्यास, ऋषिराज व अन्य दोघांना विमानतळावर सोडल्याची माहिती समोर आली. त्यानंतर धावपळ सुरू झाली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो अन् त्याचे दोन मित्र खासगी विमानाने बँकॉकला जात असल्याचे समोर आले.
अर्ध्या तासात गुन्हा दाखल
मुलगा बँकॉकला गेल्याचे समोर आल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात अपहरणाचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर सावंत यांनी पुणे पोलिस आयुक्तालय गाठत मुलाला परत आणण्याचा प्रयत्न सुरू केले. केंद्र सरकारमधील एका मराठी नेत्याच्या मदतीने विमान पोर्ट ब्लेअरच्या पुढे गेलेले असताना, तसेच माघारी वळविण्यात आले.
Mumbai Pune Express Way : अंतर घटणार, वेळ वाचणार; मुंबई पुणे एक्स्प्रेस वेच्या मिसिंग लिंकचं काम वायू वेगाने, टार्गेट ठरलं
विमानाचे भाडे ७८ लाख ५० हजार
ग्लोबल फ्लाईट हॅडलिंग सर्व्हिसेस कंपनीकडून खासगी विमान आरक्षित केले होते. त्यासाठी ७८ लाख ५० हजार रुपये शुल्क आकारले होते. विमानात ऋषिराज, दोन मित्र तसेच महिलेसह तीन पायलट होते.
Eknath Shinde : भाजपनेही ऑफर दिलेय! चर्चा ऐकताच शिवसेनेची लगबग, घाईने ठाकरेंच्या शिलेदाराला दिल्लीला नेलं, अन् शिंदेंनी प्रवेश करुन घेतला
‘बिझनेस ट्रीपसाठी जात होतो’
विमान दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ऋषिराज आणि सोबतच्या दोन तरुणांना जबाब नोंदविला. त्यावेळी ऋषिराज याने ‘मी बिझनेस ट्रीपसाठी जात होतो. नुकताच दुबईवरून आल्याने मला जाऊ देणार नव्हते. त्यामुळे मी कोणाला सांगितले नाही,’ असे त्याने म्हटले आहे.

