Dhananjay Munde News : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केली जात आहेत. वाल्मिक कराडची चाैकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया या आक्रमक होताना दिसत आहेत.
अंजली दमानिया यांचा मुख्यमंत्र्यांना मेसेज
आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केली आहेत. आता नुकताच अंजली दमानिया यांनी मोठा खुलासा केलाय. अंजली दमानिया म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खासगी नंबरवर पाठवले आहेत.
अजित पवारांच्या बैठकीला अनुपस्थित, भरत गोगावले यांनी थेट सांगितले कारण, म्हणाले, फक्त…पुढे अंजली दमानिया यांनी म्हटले की, मी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना 14 पानाचे पत्र पाठवले आहे. आता कॅबिनेटमध्ये याची चाैकशी लावणे गरजेचे आहे. काल रात्री आणि आज सकाळी सुद्धा मी देवेंद्र फडणवीस यांच्या पर्सनल मोबाईल नंबरवर मी अनेक पुरावे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचे पाठवले आहेत. मुख्यमंत्री योग्य कारवाई करत असतील तर त्यांनी चाैकशी लावली पाहिजे, असे दमानिया यांनी म्हटले.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात
मुख्यमंत्र्यांनी आजतरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असेही दमानिया यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना अंजली दमानिया या दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतरांची चाैकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल अगोदरच आपली भूमिका ही जाहीर केलीये.

