• Mon. Mar 9th, 2026
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    कुणाच्या ‘तालमीत’ यावरून मंत्री उदय सामंत आणि चंद्रकांत पाटलांच्यात मिश्कील टोलेबाजी

    उद्योग मंत्री उदय सामंत आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात सांगलीत कोणाच्या तालमीत तयार झालोय, आणि एकदा शब्द दिला तर…यावरून मिश्कील टोलेबाजी रंगली. सांगलीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उद्योग व व्यापार परिषदेला उद्योग मंत्री उदय सावंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील येथे उपस्थित होते.यावेळी आपल्या भाषणात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी आपण जयंत पाटील यांच्या तालमीत तयार झालो,असा विधान केलं. यावर लगेच मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांकडे नजर टाकत”मग मूळ राष्ट्रवादी,अशी मिश्किल टिप्पणी केली. यावर मंत्री सामंत यांनी लगेच “पूर्वी जयंत पाटलांच्या तालमीत तयार झालो, आता तुमच्या तालमीत तयार होतोय” असे मुिश्किल उत्तर दिले. त्यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed