• Mon. Jun 8th, 2026
    ऐकत नाही म्हणून माझं तोंड दाबण्यासाठी फडणवीसांचं षडयंत्र, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांनी आपल्यासोबत षडयंत्र केल्याचा आरोप केला आहे. तसंच मराठा, धनगर समाजाचा घात केल्याचंही ते म्हणाले.

    ऐकत नाही म्हणून माझं तोंड दाबण्यासाठी फडणवीसांचं षडयंत्र, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : २२ वर्षे झाली कुटुंबात काय चाललं मला माहित नाही, तर पाहुणेरावळे कुठून आणतो? सगळा महाराष्ट्र माझा पाहुणे आहे. देवेंद्र फडणवीस मी थांबत नसतो. देवेंद्र फडणवीस मी थांबत नाही. तुम्ही माझ्याबरोबर षडयंत्र यंत्र केलं. आमच्या मायबाप महिला, लेकरांना रक्ताच्या थारोळ्यात पाडणारे तुम्ही पहिले गृहमंत्री आहेत. तीन – तीन वर्षाचे लेकरं, वयस्कर लोक खाली पडले. आमच्या आई – बहिणीचे नाक तुटले इतकं मारलं. तुमच्यासारखा क्रूर कृत्य करणारा मुख्यमंत्री लाभला नाही. आमच्या काळजात ती सल आहे, असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला ऐकत नाही, दाबत नाही, म्हणून माझं तोंड बंद करायसाठी चाल अन् षडयंत्र रचत आहे. पाहुणे-रावळ्यांचा विषय काढतात, सगळा महाराष्ट्र माझा पाहुणे आहे. मी समाजाला वाऱ्यावर सोडत नाही. तुम्हाला वाटत असेल गुंतवल्यावर मी गप्प बसले? मी कुणाला घाबरत नाही. फडणवीस तुम्ही मराठा आणि धनगर समाजाचा मोठा घात केला, माझं तोंड बंद करायसाठी नोटीस देता? मात्र माझं तोंड बंद होणार नाही, असा इशाराच जरांगे पाटीला यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
    रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळेतील मुलांना जुंपलं, जिल्हा परिषद शिक्षकांचा कारनामा; पालकांकडून संताप व्यक्त
    ज्या पोलिसांनी लाठी हल्ला केला त्यांना बडता दिले आहेत आम्ही हे विसरलो नाही. गोळ्यांचा आवाज आला, तर आजही मुलं घाबरतात. मी आरक्षण मागू नये, गरीबाच्या मुलाचा फायदा होऊ नये, मोठे होऊ नये, नोकरीला लागू नये, म्हणून षडयंत्र रचत आहे. चाकणच्या पोरांवर गुन्हे दाखल केले, अकोल्यात देखील तसंच केलं साखळी उपोषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबईत पोरांनी ८-८ महिने जेल बघितले, असं म्हणत फडणवीसांनी षडयंत्र रचल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
    Sanjay Raut : निवडणुका सैतानी पद्धतीने लढवल्या जात आहेत, दिल्ली निकालानंतर संजय राऊत भडकले

    ऐकत नाही म्हणून माझं तोंड दाबण्यासाठी फडणवीसांचं षडयंत्र, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

    स्वतःची मुलगी जशी वाटते तसं तुम्हाला मराठ्यांच्या मुलींबाबत वाटत नाही. स्वतःच्या मुलीसाठी पाचशे मीटर दूर राहायला जाऊ शकत नाही. आमच्या अनेक लेकरं दोन – दोन, पाच – पाच किलोमीटर पायी शिकायला जातात. मागण्या मान्य करू असं म्हणत त्यादिवशी गोड बोलून उपोषण सोडवायला लावलं. आज १४ दिवस झाले आहेत, अशी आठवणही जरांगे पाटील यांनी करुन दिली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed