Drug Seized In Mumbai : मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई विभागीय युनिटला मिळाली व ते अमली पदार्थ नवी मुंबई भागात असल्याचे समोर आले. त्या आधारे टाकलेल्या छाप्यात अमली पदार्थांचा मोठा साठा हाती लागला.
एनसीबी मुंबईने विभागीय अतिरिक्त आयुक्त अमित घावटे यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात २०० ग्रॅम कोकेन जप्त केले होते. त्या कारवाईनंतर गुप्त माहितीच्या आधारे एका आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीच्या कार्यालयात ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या पार्सलची तपासणी करण्यात आली. तेथून प्राप्त माहितीच्याआधारे तांत्रिक व मानवी अभ्यास करण्यात आला. त्यानंतर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई विभागीय युनिटला मिळाली व ते अमली पदार्थ नवी मुंबई भागात असल्याचे समोर आले. त्या आधारे टाकलेल्या छाप्यात अमली पदार्थांचा मोठा साठा हाती लागला.मालकिणीच्या खात्याची नोकराकडून ‘सफाई’; मोबाइलवरुन वळविले ८ लाख रुपये, काय घडलं?
यामध्ये उच्च दर्जाचे ११.५४० किलो कोकेन, ४.९० किलो हायड्रोपोनिक गांजा व ५.५० किलो वजनी कॅनाबीज जप्त करण्यात आले. या अमली पदार्थांची २०० पाकिटे होती. यासोबतच १.६० लाख रुपयांची रोखही ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे.चुकून गोळी सुटली, दोघांचा मृत्यू; मित्राने एकावर अंत्यविधी उरकले, दुसऱ्याला पालघरच्या जंगलात गाडलं
परदेशातील टोळी सक्रियया तस्करीत परदेशातील टोळी सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांपैकी काही पदार्थ हे अमेरिकेतून मुंबईत आणले. ते मुंबईत पाठविण्यासाठी परदेशातील टोळी सक्रिय होती. मुंबईतून हे अमली पदार्थ देशाच्या विविध भागांतील दलाल, विक्रेत्यांना कुरिअरच्या माध्यमातून पोहोचवले जाणार होते. मुख्य म्हणजे, या साखळीत सहभागी दलाल एकमेकांना अनोळखी असून ते विविध नावांचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात होते, असे तपासात समोर आले आहे.