• Fri. Mar 13th, 2026

    धनंजय मुंडे यांच्या वकिलांची प्रेस नोट, अंजली दमानिया यांचा नवा गौप्यस्फोट

    धनंजय मुंडे यांच्या वकिलांची प्रेस नोट, अंजली दमानिया यांचा नवा गौप्यस्फोट

    “मी कृषी घोटाळा काढला. त्यावर खोटं बोलले. आता कोर्टाची ऑर्डर आहे. त्याला त्यांचे वकील खोटं बोलत असतील तर मग आता या लोकांना काय बोलायचं? ते कळत नाही. खरंतर आताच्या घटकेला धनंजय मुंडे यांच्यावर सरळसरळ कोर्टाने ठपका ठेवला आहे”, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : वांद्रे कोर्टाने करुणा शर्मा यांना दिलासा दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून करुणा शर्मा यांना पोटगी देण्यात यावी, असे निर्देश कोर्टाने दिल्याची माहिती समोर आली आहे. या सुनावणीनंतर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी जी प्रेस नोट जारी केली होती त्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या वकिलांवरही टीका केली आहे. धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी प्रेसनोटमधून चुकीची माहिती दिल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

    “करुणा मुंडे यांनी मला आधीदेखील संपर्क केला होता. त्यांचा विषय मी लढावा असं त्यांचं मत होतं. पण मी कोणाच्याही वैयक्तिक मुद्द्यांवर कधीच बोलत नाही. म्हणून मी बाकी काहीच बोलले नव्हते. मला आताच्या घटकेला स्त्री म्हणून बोलावसं वाटतंय. कारण त्यांना आज जी ऑर्डर मिळाली आहे, ती अतिशय गंभीर आहे”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

    धनंजय मुंडे यांच्या वकिलांच्या प्रेसनोटवर अंजली दमानिया काय म्हणाल्या?

    “मला आता असंही सांगण्यात आलं आहे की, धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी प्रेस नोट जारी केली आहे. त्यामध्ये सरळसरळ म्हटलं आहे की, कौटुंबिक हिंसाचाराबद्दल कोर्टाने काहीच म्हटलेलं नाही. पण कोर्टाने डोमेस्टिक वायलन्स झालंय असं म्हटलं आहे. कोर्टाने निर्देशही दिले आहेत की, अशाप्रकारचं डोमेस्टिक वायलन्स व्हायला नको”, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.
    ‘मी रखेल नाही; वाल्मिक कराडने मला चुकीचा स्पर्श केला’, करुणा शर्मा यांचे रडता-रडता खळबळजनक आरोप
    “मी कृषी घोटाळा काढला. त्यावर खोटं बोलले. आता कोर्टाची ऑर्डर आहे. त्याला त्यांचे वकील खोटं बोलत असतील तर मग आता या लोकांना काय बोलायचं? ते कळत नाही. खरंतर आताच्या घटकेला धनंजय मुंडे यांच्यावर सरळसरळ कोर्टाने ठपका ठेवला आहे. कौटुंबिक हिंसाचार झाला आहे, असं कोर्टाने नमूद केलं आहे. ती ऑर्डर आता माध्यमांना दाखवावी आणि त्याची कॉपी धनंजय मुंडे यांच्या वकिलांना पाठवावी, अशी मी विनंती करते”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

    “कोर्टच्या ऑर्डरला खोटं म्हणणाऱ्या वकिलांच्या विरोधात बार काउन्सिलला तक्रार दिली पाहिजे की, अशा वकिलांची सनद रद्द करण्यात यावी. कारण कोर्टच्या ऑर्डरला ते खोटं म्हणत असतील तर अशा व्यक्तींची सनद सुद्धा रद्द झाली पाहिजे”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed