• Wed. Sep 16th, 2026

उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते राजन साळवी यांच्याबद्दल किरण सामंत यांचा मोठा दावा, पक्षप्रवेश का रखडला?

उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते राजन साळवी यांच्याबद्दल किरण सामंत यांचा मोठा दावा, पक्षप्रवेश का रखडला?

“राजन साळवी यांना लोकसभेनंतरही आमच्या पक्षाकडून आमंत्रण होतं. ते येतो म्हणून सांगत होते. पण त्यांचा गैरसमज असा झाला की, महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि मी आमदार होणार, मंत्री होणार. त्या अनुषंगाने ते तिथे राहिले आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं”, असं किरण सामंत म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे जवळचे नेते राजन साळवी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा होती. पण त्यांचा पक्षप्रवेश रखडला आहे. याबाबत शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “मला निवडणुकीपूर्वीच कल्पना होती की, ही निवडणूक मी जिंकणार आणि जे निष्ठावंत म्हणून सांगतात ते आपली नंतर निष्ठा सांगतात. मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच ऐकतोय की, ते भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणार. त्यांची उबाठामधील दारे बंद झाली आहेत हे देखील आपल्या माध्यमातून मी ऐकलं आहे. पण त्यांच्या अस्थिरपणामुळे उबाठामधील बरीच लोकं, कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांनी अन्य कोणत्या पक्षात प्रवेश केला तर त्या पक्षाची लोकंदेखील आमच्या संपर्कात आहेत. त्या पक्षातून देखील बरीच लोकं आमच्या पक्षात येतील”, असा दावा किरण सामंत यांनी केला.

“राजन साळवी यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात जायला कुणीही तयार नाहीत. ते सर्व आमच्या संपर्कात आहेत. त्यांचे पक्षप्रवेश आपण रोज पाहतोय. ते ज्या पक्षात जातील त्या पक्षामधील लोकं परत आमच्या पक्षामध्ये येतील. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबला आहे, असं मला वाटतं”, असं किरण सामंत यांनी सांगितलं.
Eknath Shinde : ‘सोन्याची अंड देणारी कोंबडी समजून मुंबईला…’, एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर खोचक निशाणा

‘राजन साळवींना आमच्या पक्षाकडूनही आमंत्रण होतं’

“राजन साळवी यांना लोकसभेनंतरही आमच्या पक्षाकडून आमंत्रण होतं. ते येतो म्हणून सांगत होते. पण त्यांचा गैरसमज असा झाला की, महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि मी आमदार होणार, मंत्री होणार. त्या अनुषंगाने ते तिथे राहिले आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडून आली. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी मोठे प्रयत्न केले, असं माझ्या कानावर आलं आहे. त्यातील तथ्य मला माहिती नाही. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हा शिवसैनिकांना मान्य आहे”, असं किरण सामंत म्हणाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed