Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांगलादेशींच्या घुसखोरीबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी बाहेरुन महाराष्ट्रात होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेश, बिहारचं नाही, तर…
यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं, की लोक गावा-गावातून मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर करत आहेत. ग्रामीण भागात संधी मिळत नसल्याने लोक शहरांकडे वळत आहेत. पण जसं स्थलांतर वाढतं आहे, तसं शहरांमध्ये गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे शहरांत झोपडपट्ट्यांमध्ये वाढ होते. पण सरकार चांगल्या हेतूने झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवते आहे, असं अजित पवार म्हणाले.
प्रेमसंबधातून दोघांवर कोयत्याने वार, दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी, इंदापुरातील धक्कादायक घटना
पण जेव्हा झोपडपट्टीतील रहिवाशांना या पुनर्वसन योजनांतर्गत योग्य, चांगली घरं मिळतात, तेव्हा ते उत्तर प्रदेशातील लोक त्यांच्या नातेवाईकांना कळवतात. जे नंतर इथे येऊन स्थायिक होतात. केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकच नव्हे, तर बांगलादेशी घुसखोरही महाराष्ट्रातील शहरांमध्ये येत आहेत, त्यामुळे गर्दी वाढते आहे, असा मुद्दाही त्यांनी मांडला.
आता मुंबई ते गोवा सुस्साट…. १२ तासांचा प्रवास ६ तासांवर, कुठून, कसा असेल मार्ग?
अजित दादांचं पाणी, वीज, वाहतुकीच्या मुद्दांवर भाष्य
यावेळी बोलताना अजित दादांनी सांगितलं, आम्हाला गतिशीलता सुधारण्याची गरज आहे. २०५४ पर्यंत पिंपरी-चिंचवडसह पुण्याची लोकसंख्या दोन कोटींच्या आसपास पोहोचेल असा अंदाज आहे. पण त्यासाठी आमचे प्रयत्न अपुरे आहेत. लोकसंख्या दोन कोटींवर पोहोचली, तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी पुरेसे पाणी कुठून आणणार? त्याशिवाय शहरातील वाहतूक आणि वाहतुकीचे प्रश्न दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहेत, असाही मुद्दा त्यांनी मांडला. त्याशिवाय त्यांनी विजेच्या गरजेबाबतही भाष्य केलं.
केवळ उत्तर प्रदेश, बिहारचे नाही तर महाराष्ट्रात…. बांगलादेशींच्या घुसखोरीवर अजित पवारांचं मोठं विधान
मुळशी येथील टाटा वीज प्रकल्पाद्वारे सध्या वापरलं जाणारं धरणाचं पाणी पुण्याच्या गरजा भागवण्यासाठी शहरी भागात वळवलं जावं, असं ते म्हणाले. तसंच विद्युत निर्मितीसाठी वापरलं जाणारं धरणाचं पाणी सार्वजनिक वापरासाठी वाटप करण्यासाठी न्यायालयात जावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

