• Thu. Jul 30th, 2026
    आईचे अनैतिक संबंध, पुण्यातील तरुणाचं डोकं फिरलं, चौकडी जमवली, कोथरुडमध्ये भररस्त्यातच…

    Pune Mother Boyfriend Murder : एका तरुणाच्या आईसोबत मयत तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. या कारणातूनच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    पुणे : दुचाकीवरुन जात असलेल्या तरुणावर कोयतासदृश शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना पुणे शहरातील कोथरुड परिसरात गुरुवारी सायंकाळी घडली. हल्ल्यानंतर आरोपी कोयते नाचवून आरडाओरड करीत पळून गेले.

    भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे कोथरूड परिसरात दहशतीचे वातावरण होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एका तरुणाच्या आईसोबत मयत तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. या कारणातूनच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    काय आहे प्रकरण?

    राहुल जाधव असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. कोथरूड येथील सागर कॉलनी परिसरात सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. राहुल दुचाकीवरून जात असताना तीन ते पाच जणांच्या टोळक्याने आरडाओरडा करून पालघन (कोयतासदृश शस्त्र), कोयता व अन्य शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला.
    Nagpur Crime : मम्मी-पप्पा, मी तुमच्यावर खूप प्रेम करते; पण पवनने माझा… १७ वर्षीय विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं

    आईचे तरुणीशी प्रेमसंबंध

    प्राथमिक माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे एका तरुणाच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर आरोपींनी राहुलला ठार मारण्याचा कट रचून त्याच्यावर हल्ला केला.

    Pune Crime : आईचे अनैतिक संबंध, पुण्यातील तरुणाचं डोकं फिरलं, चौकडी जमवली, कोथरुडमध्ये बॉयफ्रेण्डला भररस्त्यातच…

    ठाण्यात नोकरीच्या आमिषाने शिक्षिकेवर अत्याचार

    दुसरीकडे, नोकरीमध्ये कायम करण्याचे आमीष दाखवून लैंगिक अत्याचार केला असा आरोप एका शिक्षिकेने केल्यानंतर ठाण्यातील शाळेच्या संस्थाचालकावर श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या आरोपीला गुरुवारी अटक केली आहे. शारीरिक संबंधांस नकार दिल्याने आरोपी हा शाळेतून काढून टाकण्याची धमकी देत असल्याचा आरोप पीडित शिक्षिकेने केला आहे.
    Navi Mumbai Accident : रिव्हर्स घेताना पिकअपने चिरडलं, नवी मुंबईत आईसोबत चालणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत
    ही शाळा वागळे इस्टेट परिसरात असून या शाळेतील महिला शिक्षकांना अपशब्द वापरल्याची तक्रार आल्यानंतर संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात शाळेत जाऊन या आरोपीसह मुख्याध्यापकास मारहाण केली होती. एका शिक्षेकेच्या तक्रारीनंतर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, आता आणखी एक नवीन प्रकरण समोर येत याच शाळेतील एका महिला शिक्षिकेने संस्था चालकावर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Nagpur News: पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा
    Satara Koyna Dam : ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’! साताऱ्यातील धरणाच्या जलाशयाला मिळाली नवी ओळख; सरकारचा मोठा निर्णय
    Sangli Crime : महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed