Hinjawadi Dumper Accident : हिंजवडीतील अपघातात प्रांजली महेश यादव आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे अशी मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत.
दुसऱ्या घटनेत कचरा वाहतूक करणाऱ्या महापालिकेच्या डंपरने पीएमपी बसचालकाला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार वानवडीत घडला. तर तिसऱ्या घटनेमध्ये बारामतीत चालकाने जागेवर डंपरचा ‘यू टर्न’ घेताना एका भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, हिंजवडीतील अपघातात प्रांजली महेश यादव (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ शेगाव, रहाटगाव रोड, अमरावती) अशी मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत.
Pushpa Agashe : ४३ वर्ष आईने जो वसा जपला, पुष्पा ताईंच्या निधनानंतर लेकाने पाळला, आगाशे कुटुंबाचा स्तुत्य निर्णय
तरुण थोडक्यात बचावला
भरधाव डंपर दोन तरुणींच्या अंगावर आला, त्या वेळी तेथून एक तरुणही दुचाकीवरून चालला होता. मात्र, डंपर उलटत असल्याचे पाहताच त्याने दुचाकी सोडून पळ काढला आणि तो थोडक्यात बचावला. विद्यार्थिनींना उडवणाऱ्या रेडीमिक्स डंपरच्या चालकाने दारू प्यायली होती. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
Bhandara Blast : आयुष्यभर कष्ट उपसले, आता निवांत जगू; निवृत्तीच्या ४ महिन्याआधी घात, भंडारा स्फोटाने सारं हिरावलं
Pune Accident : हिंजवडीत डंपर पलटी, दोन कुटुंबांची स्वप्न चिरडली, विद्यार्थिनींच्या शरीराचा चेंदामेंदा
डंपरची धडक, पीएमपी चालकाचा मृत्यू
दुसरीकडे, कचरा वाहतूक करणाऱ्या महापालिकेच्या डंपरने पीएमपी चालकाला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार वानवडीमध्ये घडला. बसचा आरसा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डंपर चालकाला पीएमपी चालकाने सुमारे अर्धा किलोमीटर अंतर पाठलाग करून थांबवले. डंपर चालकाने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता, धक्का लागून पीएमपीचा चालक खाली पडला आणि डंपरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संजय मच्छिंद्र देशमुख (वय ५० रा. काळेपडळ) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

